Nagpur Crime News: भयंकर! डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमादिवशीच पतीची हत्या; नागपूर हादरलं

Nagpur Breaking News: पत्नीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच शेजाऱ्यांकडून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनहद्दीत घडली.
Nagpur Breaking News
Nagpur Breaking NewsSaamtv
Published On

पराग ढोबळे, प्रतिनिधी|ता. २३ फेब्रुवारी २०२४

Nagpur Crime News:

नागपूरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच शेजाऱ्यांकडून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. महेश बावणे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पत्नीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमातच पतीची शेजारच्या बाप लेकांकडून हत्या करण्यात आल्याची घटना नागपुरच्या (Nagpir) इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जाटतरोडी भागात घडली. महेश बावणे असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेदिवशी बावणे यांच्या पत्नीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता.

यावेळी घरी मेहंदी काढायला आलेल्या मुलीच्या आईने आरोपींकडून उधार घेतलेले पैसे परत का करत नाही म्हणून वाद झाला. यावेळी महेश बावणे यांचा आरोपी शेरू राठोड आणि रितीक राठोड यांच्यासोबत बाचाबाची झाली. मृतक महेशने आरोपी शेरू राठोड आणि रितीक राठोड यांना समज देण्याचा प्रयत्न केला असतानाच त्याची चाकू ने भोसकून हत्या केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Breaking News
Shetkari Andolan: केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक; आज 'काळा दिवस' पाळणार

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मारेकरी शेरु राठोडला अटक करण्यात आली असून सहआरोपी मुलगा रितीक राठोड हा फरार आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाळाच्या जन्माअगोदरच वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Nagpur Breaking News
Manohar Joshi News: हिंदुहृदयसम्राटांचा एका ओळीत आदेश अन् मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपद सोडलं; नेमकं काय घडलेलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com