Pune Firing: पुण्यात झालेल्या गोळीबाराच्या आधीचा सीसीटीव्ही 'साम टीव्ही'च्या हाती, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

Pune Firing CCTV: पुण्यात आज पहाटे झालेल्या गोळीबाराच्या आधीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागला आहे. घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Pune Firing CCTV
Pune Firing CCTVSaam Tv

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Firing CCTV Video) भुमकर चौक परिसरात आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबाराच्या आधीचा सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागले आहे. घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुण्यात मागील २४ तासांतील ही तिसरी गोळीबाराची घटना होती.

पुणे शहरात अवघ्या दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. माचीस मागीतल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वादाचा व्हिडिओ (Pune Crime News) आता समोर आला आहे. गणेश गायकवड (रा. वारजे) असं ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्या व्यक्तीचं नाव आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (Pune Crime) रात्री 1 वाजता गणेश हा दारू घेण्यास नवले ब्रिज येथे चैतन्य बार ठिकाणी आला होता. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपीही जमले होते. त्याने सहज माचीस आहे का? असं विचारलं. यावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून आरोपीने गोळी झाडली आहे. ती गोळी गणेश याच्या खांद्याला लागली यात तो जखमी झाला. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू (Crime News) आहे

जंगली महाराज रस्त्यावर १६ एप्रिल रोजी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गोळी न झाडली गेल्यामुळे व्यवसायिकाचा (Pune Firing) जीव वाचला होता. तर तिसरी घटना १७ एप्रिल रोजी हडपसर शेवाळेवाडी येथे घडली होती. व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसर्‍या माजी सैनिकावर गोळीबार केला होता. त्यामध्ये एकजण जखमी झाला होता.

Pune Firing CCTV
Salman Khan House Firing: आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले भाविक; हल्लेखोर मंदिरात झोपले होते बेसावध, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

त्यामुळे पुणे पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवर असलेल्या बंदूकबाजांची पोलीस आयुक्तालयात बोलवून परेड घेतली होती. त्यांना चांगलीच तंबी दिली होती. त्यानंतर गोळीबाराच्या या दोन घटना घडल्या (Pune Firing CCTV) होत्या. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Pune Firing CCTV
Pune Fire News: पुण्यातील कसबा पेठ परिसरातील तीन मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com