

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाकडून आईचा खून
आईच्या हत्येप्रकरणी मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात
दारूच्या पैशांवरून भोरमध्ये आई आणि मुलामध्ये वाद
सचिन जाधव, साम प्रतिनिधी
पुण्याच्या भोर तालुक्यातल्या वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी गावात एक धक्कादायक घटना घडलीय. दारुच्या नशेत एक तरुणाने आपल्या आईचा खून केलाय. डोक्यावर आणि तोंडावर लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केला. या घटनेमुळे गावात खळबळ उडालीय. बेबी काळू मालुसरे वय ५२ अशी हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. घटनेनंतर भोर पोलिसांनी आरोपी मुलगा समीर काळू मालुसरे (वय 31) याला ताब्यात घेतलंय
समीर याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या समीरने तिच्या डोक्यात आणि तोंडावर लोखंडी रॉडने वार केले. या हल्ल्यात बेबी मालुसरे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने मृत आईचा मृतदेह घरातच ठेवून घराला बाहेरुन कुलूप लावले. तसेच शेजाऱ्यांना आई गावाला गेल्याचे सांगितले. काही तासांनंतर आरोपी पुन्हा घराजवळ आला आणि आई घरातच असल्याचे सांगितले.
दरम्यान, महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी भोर पोलिसांशी संपर्क साधला. भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी समीर मालुसरे याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस दत्तात्रय जाधव, विशाल मोरे, दीपक गायकवाड आणि हेमंत भिलारे करीत आहेत.
नांदेड शहरातील धनेगाव जवळच्या पेट्रोल पंपावर भरदिवसा एका तरुणाचा खून करण्यात आला. दोन आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केला. इंदर सिंग बावरी वय ३२, असे मयत युवकाचे नाव आहे.तो शहरातील कौठा भागातील रहिवाशी होता.आज दुपारी इंदर सिंग बावरी हा पेट्रोल टाकण्यासाठी दुचाकी घेऊन पंपावर गेला होता. त्या ठिकाणी दोन आरोपी आले त्यांनी धारदार शास्त्राने वार केले.यात त्याचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान गॅंगवॉर मधून ही घटना घडल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे.याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.