Mumbai : मुंबई हादरली! शाळा सुटल्यावर मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून लैंगिक अत्याचार

Mumbai Mahim Crime News : मुंबईच्या माहीममध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप. प्रकरणी दोन अल्पवयीन संशयितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
Mahim Mumbai Crime: 13-Year-Old Girl Assault Case
Mahim Mumbai Crime: 13-Year-Old Girl Assault Case Saam Tv
Published On
Summary
  • मुंबईच्या माहीम परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • शाळा सुटल्यानंतर मुलीला जबरदस्तीने दुचाकीवरून निर्जन ठिकाणी नेल

  • या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

  • पीडितेचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

  • माहिम पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू

Mumbai Mahim 13 Years Old Girl Gang Rape मुंबईतील गजबजलेल्या माहीम परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला शाळा सुटल्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून माहिम पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मुंबईसारख्या वर्दळीच्या ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी माहिममधील एका नामांकित शाळेजवळ ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १६ वर्षीय मुलाने पीडितेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिला एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे तिचे हात आणि तोंड बांधण्यात आले. संबंधित प्रकरणातील मुलगा अल्पवयीन असून पीडितेच्या ओळखीचा होता तर दुसरा मुलगा अनोळखी होता. दोघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

Mahim Mumbai Crime: 13-Year-Old Girl Assault Case
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

घटनेनंतर आरोपींनी पीडित मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमक्यांमुळे मुलगी मानसिक तणावाखाली होती. मात्र, अखेर तिने पालकांना घडलेली घटना सांगितली. संतापलेल्या पालकांनी तातडीने माहिम पोलीस ठाण्यात दाखल होत २ तरुणांविरोधात तक्रार दाखल केली.

Mahim Mumbai Crime: 13-Year-Old Girl Assault Case
Rain Update : राज्यात विजांसह मुसळधार पाऊस, नाशिकसह ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; वाचा हवामानाचा अंदाज

तक्रार मिळताच पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी भाभा रुग्णालयात करून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोन्ही अल्पवयीन संशयितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. या घटनेमुळे मुंबईत अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com