पोयसर-कांदिवली हादरवणाऱ्या टोळीला मोठा दणका; दरेकर दादाविरुद्ध तब्बल ३७ गुन्हे दाखल

Mumbai Crime News: पोयसर-कांदिवली परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या दरेकर दादा टोळीविरोधात समता नगर पोलिसांनी MCOCA अंतर्गत कारवाई केली आहे. दरेकरविरुद्ध ३७ गंभीर गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची नोंद आहे.
Mumbai Crime 37 Cases Registered Against Darekar Gang, MCOCA Action Taken
Mumbai Crime 37 Cases Registered Against Darekar Gang, MCOCA Action Taken
Published On
Summary
  • पोयसर-कांदिवली परिसरातील दरेकर दादा टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई.

  • MCOCA, १९९९ अंतर्गत टोळीविरोधात कारवाई करण्यात आली.

  • यमेश दिलीप दरेकरविरुद्ध तब्बल ३७ गंभीर गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची नोंद.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

पोयसर-कांदिवली परिसरात दहशत निर्माण करून विविध गंभीर गुन्हे करणाऱ्या यमेश दिलीप दरेकर उर्फ दादा याच्या टोळीविरुद्ध समता नगर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA), १९९९ अंतर्गत कारवाई केली आहे. दरेकरविरुद्ध समता नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल ३७ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका तक्रारदाराला हप्ता न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी कपडे उतरवून शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉड, लाकडी स्टंप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी येश दरेकर याने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात रोहित कृष्णप्रताप सिंग (३३) आणि सागर अनिल राठोड (२२) या दोघांना १५ जून रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी यमेश दिलीप दरेकर उर्फ दादा हा फरार असून त्याचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे.

Mumbai Crime 37 Cases Registered Against Darekar Gang, MCOCA Action Taken
Mumbai Crime: मुंबई हादरली! एअर होस्टेसवर बलात्कार, तृतीयपंथी असल्याचे सांगत घरात घुसला अन्...

३७ गुन्ह्यांची नोंद

पोलिसांच्या माहितीनुसार, यमेश दरेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध समता नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, शिवीगाळ व मारहाण, विनयभंग, शांतता भंग करणे, जीवे मारण्याच्या धमक्या आणि घरात अतिक्रमण अशा विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी दोन वेळा MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची तसेच दोन वेळा तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

रोहित कृष्णप्रताप सिंग हा दरेकरच्या टोळीतील सदस्य असून त्याच्याविरुद्ध एकूण १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तर सागर अनिल राठोड याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून २०२३ मध्ये त्याच्यावर कलम १०७ फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी MCOCA

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, येश दरेकरने विविध गुन्हेगारांना एकत्र करून संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. या टोळीच्या माध्यमातून मुंबई शहरात दहशत व वर्चस्व निर्माण करून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने हिंसाचाराचा वापर करत विविध बेकायदेशीर कृत्ये सातत्याने केली जात असल्याचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली. त्यानुसार यमेश दरेकर व त्याच्या टोळीविरुद्ध MCOCAची कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai Crime 37 Cases Registered Against Darekar Gang, MCOCA Action Taken
Crime News : महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीला उसाच्या फडात नेवून सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे करीत आहेत. संघटित गुन्हेगारी, खंडणी आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांविरोधात संताक्रूझ पोलिसांकडून कठोर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com