

मुंबईमध्ये एअर होस्टेसवर बलात्कार
आरोपीला चार तासात पोलिसांनी केली अटक
तृतीयपंथीय असल्याचे भासवून घरात प्रवेश करून केलं भयंकर कृत्य
नवऱ्याला बरे करण्याच्या बहाण्याने एअर होस्टेसवर बलात्कार
मुंबईतमध्ये २५ वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार झाल्याची घटना घडली. आरोपी तृतीयपंथी असल्याचे भासवून तिच्या अपार्टमेंटमध्ये घुसला. आरोपीने तिच्या आजारी नवऱ्याला काळी जादू करून बरे करतो असा बहाणा करत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवग्या चार तासांच्या आत त्याला कळवा येथील झोपडपट्टीतून अटक केली. अनिल शिंदे (२८ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी १२:२० ते १२:५० च्या दरम्यान घडली. आरोपी अनिल शिंदेने तृतीयपंथीयाचा वेष धारण करून एका सुरक्षा रक्षकाचा विश्वास संपादन केला आणि इमारतीत प्रवेश करून अनेक दरवाजे ठोठावले. तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एअर होस्टेस तरुणीने घराचा दरवाजा उघडला. यावेळी आरोपीने तिची नजर काढतो आणि रुग्णालयात असलेल्या तुझ्या नवऱ्याला बरे करु शकतो असे सांगितले.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्यावर पाणी ओतले. तिला संमोहित अवस्थेत बेडरूममध्ये नेले आणि डोळे मिटून पलंगवर झोपण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा तिने आरडाओरडा केला तेव्हा आरोपी तिने दिलेले २०० रुपये घेऊन पळून गेला.
मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस उपआयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक ए. एस. सावंत, निरीक्षक सुशांत बंदगर आणि उपनिरीक्षक संदीप पाटील यांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी पवई ते कळवा मार्गावरील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि पहाटे त्याला कळवा झोडपट्टीतून अटक केली.
पोलिसांनी आरोपी अनिल शिंदेला अवघ्या ४ तासांत अटक केली. त्याच्याविरोधात बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीविरोधातील गुन्ह्यामध्ये काळी जादू आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या तरतुदींचाही समावेश होण्याची शक्यता आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की त्याचे कुटुंबीय हिजड्यांचा वेश धारण करून भीक मागतात. यापूर्वीही त्याने अशाप्रकारचे अनेक गुन्हे केले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.