Dog Beaten in Navi Mumbai: नवी मुंबईच्या पेट केअर सेंटरमधील कर्मचाऱ्याची श्वानाला बेदम मारहाण; सीसीटीव्हीतून कृत्य आलं समोर

Navi Mumbai: ठाण्यानंतर आता नवी मुंबईमधील एका पेट केअर सेंटरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. या सेंटरमध्ये पाळीव श्वानाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आले आहे.
dog beaten
Animal HarrestmentCanva

Dog Beaten in Navi Mumbai Grooming Center:

ठाण्यानंतर आता नवी मुंबईमधील एका पेट केअर सेंटरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. या सेंटरमध्ये पाळीव श्वानाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आले आहे. नवी मुंबईतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ पाहून नेटकरी आणि प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्वानाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

dog beaten
Crime News : बनावट नोटा चलनात आणणा-या रॅकेटचा पर्दाफाश; कराड, कोल्हापूरसह पुण्यातील सात युवकांना अटक

मीडिया रिपोर्टनुसार, नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पेट केअर सेंटरच्या मालकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या सेंटरमधील कर्मचाऱ्याचे नाव ऋषी असे आहे. ऋषीच्या अनेक तक्रारी त्याच्या मालकाकडे येऊ लागल्या होत्या. या सर्व तक्रारींमुळे तो नेमकं काय करतो हे पाहण्यासाठी मालकानं सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी हा संतापजनक प्रकार समोर आला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, तो श्वानांना आंघोळ घालताना त्यांना मारहाण करताना दिसतोय. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. "Fight Against Animal Cruelty" आणि "street dogs of Bombay" या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच या पोस्टमध्ये सर्व पाळीव प्राण्यांच्या मालकांना आणि पेट केअर सेंटरना पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यास सांगितले आहे.

https://saamtv.esakal.com/maharashtra/beed-news-stray-dogs-attack-14-thousand-221-people-were-bitten-by-stray-dogs-in-one-year-rsj99

पेट केअर सेंटरमधील या प्रकारानंतर मालकांनी कर्मचारी ऋषीला निलंबित केले आहे. 'पिपल फॉर एथिकल ट्रिट्मेंट ऑफ अ‍ॅनिमल्स' (PETA) या संस्थेनी दिलेल्या मार्गदर्शनानंतर मालकांनी हा सर्व प्रकाराची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी त्वरित कर्मचारी ऋषीवर कारवाई करुन गुन्हा दाखल केला. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तत्पूर्वी, या घटनेमुळे पाळीव प्राण्यांच्या सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाळीव प्राण्यांच्या मालकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या वागणुकीवर लक्ष द्यावे, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे.

dog beaten
Dog Attack Video: भटक्या कुत्र्याचा १५ वर्षीय मुलावर हल्ला; थरारक VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com