CCTV Footage : सकाळी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडताच कुत्र्यांचा हल्ला; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Pune News : अचानक महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केला. एका कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतला. त्यानंतर अन्य कुत्रे देखील महिलेवर भुंकू लागले. ही घटना सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
CCTV Footage
CCTV Footage Saam TV

Pune Stray Dog Attacks :

पुण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्यालाडियम ग्रँड,व सिलीस्टोनी सोसायटीच्या आवारात आणि मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट कुत्र्यांची गर्दी झालीये. या कुत्र्यांनी आतापर्यंत अनेक वृद्ध नागरिक, पुरुष, दुचाकी वाहकधारक यांच्यावर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे.

CCTV Footage
Pune Crime: खळबळजनक! वाघोलीजवळ बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवत १६ लाखांचे दागिने लंपास

आज सकाळी देखील या परिसरात एका महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. सदर महिला माँर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. डोक्याला स्काफ बांधून रस्त्याने जात असताना काही कुत्रे महिलेच्या जवळ आले. अचानक महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केला. एका कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतला. त्यानंतर अन्य कुत्रे देखील महिलेवर भुंकू लागले. ही घटना सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील दोन महिला नागरिकांचा या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मात्र याकडे पुणे मनपाने पूर्णत: दुर्लक्ष केलेय, असा आरोप नागरिक करत आहेत. मनसेच्यावतीने पुढील तीन ते चार दिवसात या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तसे न केल्यास हेच पिसाळलेली कुत्रे अधिकाऱ्याच्या कार्यलयात सोडण्यात येतील असा इशारा देण्यात आलाय.

परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांना कोणीही मालक नसते. त्यामुळे ते रस्त्यावर पडलेलं अन्न खाऊन आपलं पोट भरतात. त्यामुळे अनेक व्यक्ती घरातील उरलेलं अन्न कुत्र्यांना खाऊ घालतात. असे केल्याने या परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आणखी वाढत चालली आहे. लहान मुलांना सकाळी शाळेत जाताना अथवा शांतता असेल तेव्हा कोणत्याही व्यक्तीस एकट्याने प्रवास करताना कुत्र्यांपासून सावधानतेने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.

CCTV Footage
Bhusawal crime : आरपीएफ कर्मचाऱ्यावर हल्ला; रेल्वे स्थानकावर नवीन स्टॉलवरून झालेला वाद सोडविताना हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com