Leopard Attack Dog Video: तुम्ही आतापर्यंत अनेक बिबट्या आणि श्वानाचा संघर्षाचे व्हिडिओ पाहिले असतील. या संघर्षात कोण वरचढ ठरू शकतो, हे कोणीही सांगू शकतो. एकटा बिबट्या शेकडो श्वानांवर वरचढ ठरू शकतो. मात्र, अहमदनगरमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील बिबट्या आणि श्वानाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
अहमदनगरमधील बिबट्या आणि पाळीव श्वानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बिबट्या रात्रीच्या अंधारात दबक्या पावलाने घराजवळ आला. घराजवळ आल्यानंतर बिबट्या काही सेकंदासाठी दरवाजासमोर थांबला. त्यावेळी दरवाजाच्या समोरच घर मालकाचा पाळीव श्नान झोपला होता.
बिबट्या या श्वानावर हल्ला करण्याच्या तयारी असतानाच श्वान जागा झाला. त्यानंतर पाळीव श्वानाने बिबट्याला पाहून जोर-जोरात भूंकण्यास सुरुवात केली. श्वानाच्या जोरदार भूंकण्यामुळे बिबट्या घाबरला. श्वानाच्या भूंकण्याच्या आवाजामुळे बिबट्याने माघार घेत जंगलात धूम ठोकली.
वृत्त संस्था एएनआयने त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांना हा व्हिडिओ महाराष्टातील अहमदनगर जिल्ह्याचा असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ अहमदनगरच्या ग्रामीण भागातील राहुरी भागातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
कुठे घडली घटना?
अहमदनगरच्या ग्रामीण भागातील राहुरी येथे बिबट्या वस्तीत शिरला होता. हा बिबट्या पाळीव श्वानाची शिकार करण्याच्या तयारीत होता. बिबट्या आणि पाळीव श्वानाचा हा व्हिडिओ वन विभागाने देखील शेअर केला आहे.
अहमदनगरमधील हा व्हिडिओ पाहून विश्वास होत नाही की, एखाद्या पाळीव श्वानाला बिबट्या घाबरू शकतो. अहमदनगरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.