Sanjay Raut On Devendra Fadnavis: तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट, फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला संजय राऊतांचे उत्तर

Devendra Fadnavis Big Statement On Sharad Pawar: 'देवेंद्र फडणवीसांकडे कोणताही नवीन मुद्दा नाही.', अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut And Devendra Fadanvis
Sanjay Raut And Devendra Fadanvis SaamTV
Published On

Mumbai News: 'शरद पवारांनी आमचा वापर केला. आमचा डबल गेम केला.', असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी त्यांना रोखठोक उत्तर दिलं आहे. 'देवेंद्र फडणवीसांकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. कदाचित ते झोपेत बडबडत असतील किंवा ते जागेपणात बडबड करत असतील. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका.', अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut And Devendra Fadanvis
Mumbai Dam Water Level : मुंबईकरांना दिलासा! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना फडणवीसांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, 'काय झालं, काय नाही हे महत्त्वाचं नाही. शरद पवारांनी डबल गेम केला नाही. त्यांनी फक्त सरकार तयार केले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवले. त्यानंतर शरद पवारांनी त्यांना फक्त समर्थन दिले हे खरं आहे. आता तुम्ही सकाळी कोणती शपथ घेतली ही तुमची गोष्ट आहे. तुम्ही जो प्रयोग केला तो फसला आहे.'

Sanjay Raut And Devendra Fadanvis
Jalna Car Accident Update: भावाचा संशय खरा ठरला! पतीनेच केली पत्नीची हत्या, जालना बर्निंग कार प्रकरणात धक्कादायक खुलासा

'शरद पवारांनी एखादी गोष्टी केली असेल तर ठिक आहे ना त्यात नवीन काय आहे. तुम्ही प्रयोग केला आणि तो फसला. ही एका ओळीची गोष्ट आहे. तुमच्या अंगलट आलं आहे. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिले नाही हे ऐवढंच आहे.', अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून देखील जोरदार टीका केली.

Sanjay Raut And Devendra Fadanvis
Ashadhi Ekadashi Celebrations: विठू नामाच्या गजराने कामगारांची पंढरी दुमदुमली; रेल्वे प्रवाशांकडून आषाढी एकादशी उत्साहात साजरी

'फडणवीस यांच्याकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. त्यांचे हे सरकार औटघटकेचे सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्णय घेण्यासाठी दिलेल्या मुदतीचा अर्धा काळ निघून गेला आहे. त्यामुळे यांचे हे सरकार 100 टक्के पडणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता.

त्यांनी सांगितले होते की, 'भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती. आमचे सरकार स्थापन होणार होते. त्यासाठी शरद पवार यांनीसुद्धा पुढाकार घेतला होता. पण नंतर शरद पवार यांनी डबल गेम केला. त्यामुळे आम्हाला पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला होता.' फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com