Kolhapur News: काळीज पिळवटून टाकणारी घटना! विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा

Mother & Son Death Due To Electric Shock: दुर्देवी घटनेत मायलेक दोघांनाही जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaamtv
Published On

रणजित माजगावकर, प्रतिनिधी....

Panhala News: राज्यभरात सर्वत्र आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2023) उत्साह सुरू असतानाच कोल्हापूरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा (Panhala) तालुक्यात विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Kolhapur News
Sanjay Raut On Devendra Fadnavis: तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट, फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला संजय राऊतांचे उत्तर

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरात (Kolhapur) दुर्देवी घटना घडली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे विजेच्या तारांचा स्पर्श होवून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले. नंदा मगदूम व अजय मुगदुम अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत.

हे दोघेही शेतामध्ये गेले होते. यावेळी शेतामध्ये तुटलेल्या विजेच्या तारांना त्यांचा धक्का लागला. या धक्क्याने शॉक लागून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. दुर्देवी घटनेत मायलेक दोघांनाही जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Kolhapur News
Ashadhi Ekadashi Celebrations: विठू नामाच्या गजराने कामगारांची पंढरी दुमदुमली; रेल्वे प्रवाशांकडून आषाढी एकादशी उत्साहात साजरी

त्रिपुरामध्ये करंट लागून ७ जणांचा मृत्यू...

दरम्यान, त्रिपुरामधूनही अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. त्रिपुरामधील उनाकोटी येथे जगन्नाथ यात्रेदरम्यान रथाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजप्रवाह रथात उतरला. या दुर्देवी घटनेत सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com