Sidhu Moosewala's Brother: टाईम्स स्क्वेअरवर ज्युनियर सिद्धू मूसेवाला झळकला, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव; पाहा Video

Sidhu Moosewala's Brother Video: सिद्धू मुसेवालाच्या वडीलांचे, त्याच्या आईचे आणि त्याच्या लहान भावाचे न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर फोटो आणि व्हिडीओ झळकले आहेत.
Sidhu Moosewala's Brother Featured Times Square Billboard
Sidhu Moosewala's Brother Featured Times Square BillboardSaam Tv

Sidhu Moosewala's Brother Featured Times Square Billboard

दिवंगत पंजाबी सिंगर सिद्धु मुसेवालाच्या (Sidhu Moosewala) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला. ५८ व्या वर्षी चरण कौर आई झाल्या आहेत. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी ही गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली होती. सिद्धू मूसवालाच्या लहान भावाचा जन्म होताच त्याची जगभरामध्ये चर्चा सुरू आहे. सिद्धू मुसेवालाच्या वडीलांचे, त्याच्या आईचे आणि त्याच्या लहान भावाचे न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर फोटो आणि व्हिडीओ झळकले आहेत. (Singer)

Sidhu Moosewala's Brother Featured Times Square Billboard
'Swatantrya Veer Savarkar' की 'Madgaon Express', रिलीजच्या पहिल्या दिवशी कोणाचं बॉक्स ऑफिसवर पारडं जड? जाणून घ्या...

सिद्धू मुसेवालाच्या लहान भावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलिवूड’च्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. (Bollywood News)

टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर सिद्धू मुसेवालाचा जन्मलेला फोटो आणि त्याच्या भावाचा शुभदिपचा फोटो एकत्र करून फोटो त्यांनी दाखवला आहे. त्यासोबतच मूसवालाचे वडील बलकौर सिंह यांनी शुभदीपला आपल्या मांडीत घेतलेला फोटोही दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (Sidhu Moosewala)

'सिद्धू मूसवालाच्या फॅमिलीसाठी अभिमानाचा क्षण, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुसेवाला फॅमिलीचा फोटो दिसला.' अशा वेगवेगळे कमेंट करत सिद्धूच्या भावाचे चाहते कौतुक करत आहेत. पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. (Viral Video)

गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धु मुसेवालावर मानसाच्या जवाहर गावाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिद्धू मुसेवालाचा जागीच मृत्यू झाला होता. सिद्धू मुसेवाला हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या वारसाच्या हितासाठी त्याच्या पालकांनी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. (Entertainment News)

Sidhu Moosewala's Brother Featured Times Square Billboard
Kangana Ranaut Net Worth: फ्लॉप चित्रपट देऊनही ‘पंगा गर्ल’ करते करोडोंची कमाई, कंगना रणौत आहे इतक्या कोटींची मालकीण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com