'Swatantrya Veer Savarkar' की 'Madgaon Express', रिलीजच्या पहिल्या दिवशी कोणाचं बॉक्स ऑफिसवर पारडं जड? जाणून घ्या...

Swatantrya Veer Savarkar Madgaon Express Day 1 Collection: दोन्हीही वेगवेगळ्या धाटणीचे असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच चित्रपटांची जोरदार चर्चा होत आहे.
Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 1 Box Office Collection
Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 1 Box Office CollectionSaam Tv
Published On

Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 1 Box Office Collection

बॉक्स ऑफिसवर काल अर्थात २२ मार्चला अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. त्यातीलच चित्रपट म्हणजे रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि प्रतिक गांधीचा ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. दोन्हीही वेगवेगळ्या धाटणीचे असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय ?, पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई कोणत्या चित्रपटाने केली आहे, जाणून घ्या... (Bollywood)

Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 1 Box Office Collection
Kangana Ranaut Net Worth: फ्लॉप चित्रपट देऊनही ‘पंगा गर्ल’ करते करोडोंची कमाई, कंगना रणौत आहे इतक्या कोटींची मालकीण

रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी दिलासादायक कमाई केली आहे. सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाची ओपनिंग डेची कमाई दिलासादायक ठरली आहे. चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाने स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका त्याने साकारली आहे. या चित्रपटामध्ये ‘बिग बॉस १७’ फेम अंकिता लोखंडेही प्रमुख भूमिकेत आहे. तिने चित्रपटामध्ये सावरकर यांच्या पत्नीचे पात्र साकरले. या मल्टीस्टारर चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती रणदीप हुड्डानेच केली आहे. (Bollywood Film)

तर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासोबतच कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपट देखील थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अनिवाश तिवारी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १.५० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाची ओपनिंग डेची कमाई दिलासादायक ठरली आहे. दोन्हीही चित्रपटांच्या कमाईमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अद्याप निर्मात्यांतकडून चित्रपटाच्या कमाईचा आकडा समोर आलेला नाही. पहिल्या दिवशी प्रतिक गांधीच्या ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपटाने रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला मागे टाकले. (Bollywood News)

Swatantrya Veer Savarkar And Madgaon Express Day 1 Box Office Collection
Kangana Ranaut Birthday: एका 'स्विच ऑफ फोन'मुळे कंगनाचं नशीबच पालटलं, कशी झाली 'बॉलिवूडची क्वीन'

‘मडगाव एक्सप्रेस’ हा चित्रपट कुणाल खेमूचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अनिवाश तिवारी यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही, मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री छाया कदमही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com