Kili Paul Bhim Viral Video: किली पॉलला भीमगीतांची भुरळ; भीमजयंतीची आठवण करून देणारा रील व्हिडिओ व्हायरल

Kili Paul Lip Sync on Bhim Song Watch Viral Video: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य इतकं मोठं आहे की, फक्त भारतात नाही तर अन्य देशांमध्ये देखील त्यांची जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
Kili Paul Lip Sync on Bhim Song
Kili Paul Lip Sync on Bhim SongSaam TV

Kili Paul Reel on Bhim Song:

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अवघे ४ दिवस शिल्लक आहेत. अशात सर्व भारतीय १४ एप्रिलला जयंती साजरी करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक तरुण तरुणी बाबासाहेबांच्या गाण्यांवर रील व्हिडिओ पोस्ट करत आहेत. अशात टांझानियामधील प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लुएंसर किली पॉल याने देखील भीम गितांवर रील व्हिडिओ बनवला आहे.

भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं या गाण्याने सर्वच भारतीयांना भूरळ घातली आहे. बाबासाहेबांची जयंती म्हटल्यावर अनेकजण हे गाणं गुणगुणतात. आता किली पॉलला देखील या गाण्याची भूरळ पडलीये. त्याने स्वत: या गाण्यावर रील व्हिडिओ शूट केलाय. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत जयंतीला फक्त ४ दिवस शिल्लक असल्याचं म्हटलं आहे.

Kili Paul Lip Sync on Bhim Song
Viral Video: भरधाव कारच्या विंडोमधून ती सेल्फी घेत होती; हवेच्या वेगाने फोनच उडाला, पाहा व्हिडिओ

किली पॉलच्या या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्हुव्ज आलेत. तसेच नेटकऱ्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी यावर जय भीम म्हटलं आहे. तर बऱ्याच नेटकऱ्यांनी यावर बाबासाहेबांच्या जयंतीची आतुरता असल्याचं म्हटलं आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य इतकं मोठं आहे की, फक्त भारतात नाही तर अन्य देशांमध्ये देखील त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारतात सध्या अनेक शहरांत आणि गावखेड्यांमध्ये जयंतीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्ये मिठाई, रांगोळी, फुलांचे हार आणि निळ्या झेंडे दिसत आहेत.

भीम गितांवर रील व्हिडिओ बनवलेला किली पॉल हा टांझानीयामधील प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. कायली भारतातील नसतानाही तो अगदी सहज हिंदी आणि मराठी गाण्यांवर लिप्सींग करतो. इंस्टाग्रामवर त्याचे ४ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार किली पॉल महिन्याला १ ते ५ लाखांपर्यंत उत्पन्न कमवतो.

Kili Paul Lip Sync on Bhim Song
Malegaon Eid 2024 : सामूहिक नमाजादरम्यान युवकानं फडकावला पॅलेस्टाइनचा झेंडा; मौलानांचा तातडीने खुलासा, पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com