Malegaon Eid 2024 : सामूहिक नमाजादरम्यान युवकानं फडकावला पॅलेस्टाइनचा झेंडा; मौलानांचा तातडीने खुलासा, पाहा Video

eid ul fitr 2024 : नाशिकसह राज्यातील काेल्हापूर, बीड, मावळ, सातारा येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले. त्यानंतर नागरिकांसह राजकीय नेत्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
youth enters with palestine flag in namaz pathan near malegaon nashik
youth enters with palestine flag in namaz pathan near malegaon nashiksaam tv
Published On

- अजय साेनवणे

Nashik :

एक महिन्याच्या उपवासानंतर आज (गुरुवार) ईद अल फितर (eid ul fitr 2024) म्हणजेच रमजान ईद (ramzan eid) देशभरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (malegaon) येथील सामुदायिक नमाज पठणच्या दरम्यान एका युवकाने पॅलेस्टीनचा ध्वज (palestine flag) फडकाविला. या प्रकारामुळे मुस्लिम समुदाय आश्चर्यचकीत झाला. मौलाना मुफ्ती यांनी संबंधित युवकाशी काही संबंध नसल्याचा खूलासा समुदायास केला. (Maharashtra News)

ईद निमित्त मालेगाव शहरातील मुख्य इदगाह मैदाना व्यतिरिक्त अन्य 14 ठिकाणी नमाज पठण झाले. नाशिकच्या मालेगाव येथील मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत सामुहिक नमाज अदा केली.

youth enters with palestine flag in namaz pathan near malegaon nashik
Satara Constituency: उदयनराजेंसाठी अजित पवार गट सातारा मतदारसंघ साेडण्यास तयार नाही, जाणून घ्या कारण (Video)

मौलाना मुफ्ती ईस्माइल यांनी ईदची नमाज सर्वांना पढवली. ईद निमित्त मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकसह राज्यातील काेल्हापूर, बीड, मावळ, सातारा येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले. त्यानंतर राजकीय नेत्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

youth enters with palestine flag in namaz pathan near malegaon nashik
Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, तिघे जखमी; दाेघांची प्रकृती गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com