Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, तिघे जखमी; दाेघांची प्रकृती गंभीर

samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर ट्रक चालक कुठलाही इशारा न देता अचानक लेन बदलतात त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे.
three injured at samruddhi mahamarg in a accident of car and truck
three injured at samruddhi mahamarg in a accident of car and trucksaam tv

Buldhana News :

समृद्धी महामार्गावर छाेट्या माेठ्या अपघाताचे (samruddhi mahamarg accident) सत्र सुरुच आहे. आज (गुरुवार) एका कार आणि ट्रकचा अपघात झाला. यामध्ये कारमधील तिघे जण गंभीर झाले आहेत. प्राथमिक माहितीनूसार ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने भरधाव कार ट्रकवर धडकली. ही धडक इतकी जाेरात हाेती की कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. (Maharashtra News)

या अपघाताबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार : समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर वरील चेनेज 301 जवळ समोर धावत असलेल्या ट्रक चालकाने अचानक लेन बदलली. त्याच्या मागून येणारी भरधाव कार ट्रकवर आदळली.

three injured at samruddhi mahamarg in a accident of car and truck
Satara Constituency: कराडात महायुतीचे नेते एकवटले पण आरपीआयचा काडीमाेडचा विचार; नेमकं काय म्हणाले जिल्हाध्यक्ष अशाेक गायकवाड?

या अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. या तिघांना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समृद्धी महामार्गावर ट्रक चालक कुठलाही इशारा न देता अचानक लेन बदलतात त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

three injured at samruddhi mahamarg in a accident of car and truck
Shindawane Ghat Accident News : शिंदवणे घाटात माल वाहतुकीच्या वाहनास अपघात, युवकाचा जागेवरच मृत्यू; तिघे जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com