Satara Constituency: कराडात महायुतीचे नेते एकवटले पण आरपीआयचा काडीमाेडचा विचार; नेमकं काय म्हणाले जिल्हाध्यक्ष अशाेक गायकवाड?

महायुतीच्या कराड येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे कराड येथे आले हाेते. त्यांनी कार्यकर्त्यांसह (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
republican party of india athawale faction ashok gaikwad may contest satara lok sabha election
republican party of india athawale faction ashok gaikwad may contest satara lok sabha electionsaam tv

- संभाजी थाेरात / ओंकार कदम

Satara :

लोकसभा निवडणुकीत साता-यात महायुतीच्या सर्व कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने (republican party of india athawale faction) बहिष्कार टाकला आहे. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आज (साेमवार) पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची आज साताऱ्यात बैठक झाली. ही बैठक जिल्हाध्यक्ष अशाेक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

republican party of india athawale faction ashok gaikwad may contest satara lok sabha election
Parbhani Constituency: इफ्तार पार्टीला महादेव जानकर गेले नाहीत, महायुतीमधील एक गटाची ओढवली नाराजी

यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातील महायुतीतील एकत्र आलेले सर्व पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला विश्वासात घेत नसल्याची भावना जिल्हाध्यक्ष अशाेक गायकवाड यांच्या पुढं मांडली. काही साप्तवणुक वागणुक मिळत असल्याचा आरोप केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान महायुतीतील पक्ष यांनी यापुढील काळात सन्मानाने वागणूक न दिल्यास सातारा लोकसभेसाठी वेगळा उमेदवारी अर्ज भरणार असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी माध्यमांशी बाेलताना दिला.

मोठ्या लग्नाचा याद्यांना वेळ लागतोच : उदयनराजे

दूसरीकडे महायुतीकडून सातारा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी आज (साेमवार) कराड येथे (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. अनेक भाजपचा याद्या जाहीर होवून देखील तुमचे नाव अद्याप भाजपकडून का जाहीर होत नाही या माध्यमांच्या प्रश्नावर उदयनराजेंनी मोठ्या लग्नाचा याद्यांना वेळ लागतोच त्यामुळे या मतदारसंघाची यादी देखील लवकरच जाहीर होईल अशी असे त्यांच्याच शैलीत उत्तर दिले.

Edited By : Siddharth Latkar

republican party of india athawale faction ashok gaikwad may contest satara lok sabha election
Balumama Palkhi Sohala: भंडाऱ्याची उधळण करत 'बाळूमामांच्या नावानं चांगभंल'च्या जयघोषात आदमापुरात पालखी सोहळा संपन्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com