रेल्वे स्टेशनवरुन दाम्पत्याचं 6 महिन्यांचं बाळ चाेरलं, नागपूर पाेलिसांकडून एकास तेलंगणात अटक

nagpur railway police arrests one in telangana : तेलंगणा येथे अटक केलेल्या संशयित आराेपीला नागपूर रेल्वे पाेलिस आज नागपूर येथे आणणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
nagpur railway police arrests one in telangana
nagpur railway police arrests one in telangana Saam Digital

- पराग ढाेबळे

नागपूर रेल्वे स्थानकावर भीक मागून राहणाऱ्या दाम्पत्याच्या सहा महिन्यांचा बाळाचं दोघांनी अपहरण केले हाेते. त्यानंतर दाेघेही घटनास्थळावरुन पळून गेले हाेते. दरम्यान या घटनेनंतर काही तासांतच दोघांपैकी एकाला तेलंगणा येथील मंचेरियातून रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली.

या घटनेची प्राथमिक माहिती अशी - नागपूरच्या रेल्वे स्थानकावर भीक मागून वाटेल तिथं राहणारे दाम्पत्य बाळ पाळणाऱ्या दोघांना दिसले. त्यानंतर बाळाला पळवण्यासाठी जवळीक साधून त्यांना खाऊ पिऊ घातले. दाम्पत्य झोपी जाताच भल्या पहाटे दाेघांनी बाळ पळवून नेले.

nagpur railway police arrests one in telangana
कट्टरपंथी वाद देशाला घातक, अमरावतीची शांतता अबाधित ठेवा : यशाेमती ठाकूर (पाहा व्हिडिओ)

या घटनेची माहिती दाम्पत्याने रेल्वे पोलिसांनी दिली. पाेलिसांनी तातडीने तपास सुरु केला. संबंधित दाेघे बाळासह तेलंगणा राज्यात पळाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. नागपूर रेल्वे पोलिसांनी तेलंगणामधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाला अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

nagpur railway police arrests one in telangana
पदवधीर निवडणुकीत आम्हाला विचार करावा लागेल, राणे बंधूंच्या दाव्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा भाजपला इशारा,Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com