Nashik News: चेष्टा मस्करी बेतली जिवावर; मोबाईलवर गेम खेळताना मित्रांच्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मुत्यू

Minor Death While Playing Mobile Game: नाशिकमध्ये मोबाईलवर गेम खेळताना मित्रांच्या मारहाणीत एका अल्पवयीन मुलाचा मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam Tv
Published On

Tabrez Shaikh

Nashik Crime News

अनेकदा चेष्ट मस्करीमध्ये आपण एकमेकांसोबत हाणामारी करतो, पण ही गोष्ट जिवावर देखील बेतु शकते. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. मोबाईलवर गेम खेळताना मित्रांमध्ये मस्करीत भांडण झालं. त्यात गुप्त भागात मार लागल्याने अल्पवयीन मुलाचा मुत्यु (Minor Death ) झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Crime News)

मोबाईल खेळतांना मित्राने आपल्या मित्राच्या चेष्टा मस्करीत गुप्त भागात मारलं. त्यामुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (Nashik News) देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे. याबाबत कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मित्रांच्या हाणामारीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू

नाशिकच्या देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील स्टेशनवाडी परिसरात मित्रांच्या आपापसातील वादातून झालेल्या मारहाणीत १५ वर्षीय लवनीत किरणकुमार भगवाणे हा मुलगा मरण पावला. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतलं आहे.

मृत लवनीतचे नातलग आणि तक्रारदार प्रशांत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री सात वाजता ते दोघे मोबाईलवर गेम ( Mobile Game) खेळत होते. त्यावेळी सुमित व नवनीत यांच्यामध्ये मजाक मस्ती झाली. त्यात लवनीतने प्रथम एका संशयिताच्या डोक्यात मारलं. त्यानंतर संशयितानं मृत मुलाच्या पोटात दोन बुक्के घालून त्याला खाली पाडले. नंतर त्याच्या गुप्त भागावर कोपरा मारला.

Nashik Crime News
Crime News: खळबळजनक! नाशिकमध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेचा खून, भाचा गंभीर जखमी

झालेल्या हाणामारीत लवनीत बेशुद्ध झाला असता त्यास उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल (Nashik Crime News) केलं. तेव्हा डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस तपास करत आहेत.

नाशिकमध्ये चेष्टा मस्करी जिवावर बेतल्याचं समोर आलं आहे. मोबाईलवर गेम खेळताना मित्रांच्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मुत्यू झाल्याची घटना घडली (Crime News) आहे.

Nashik Crime News
Murbad Crime News : ७५ वर्षीय वृद्ध आजोबांना पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालवलं; धक्कादायक घटनेनं मुरबाडमध्ये खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com