Crime News: खळबळजनक! नाशिकमध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेचा खून, भाचा गंभीर जखमी

Married Woman Killed: नाशिक जिल्ह्यामध्ये एका विवाहितेचा खून झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास तिच्या घरात घूसुन अज्ञांतांनी हल्ला केला होता.
Nashik Crime News
Nashik Crime NewsYandex

Tabrez Shaikh

Latest Nashik Crime News

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सामनगावमध्ये ( Samangaon) एका विवाहितेचा निर्घृण खून तर तिच्या भाच्यावर गंभीर हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरात घुसले. त्यांनी या विवाहितेवर आणि तिच्या भाच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. (Latest Crime News)

एकलहरा गेटजवळील सामनगाव येथे अज्ञात इसमांनी विवाहितेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या मृत महिलेच्या भाच्यावर देखील तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रात्री घडली (Married Woman Killed) आहे. हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशमधील आहे. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरात घूसुन विवाहितेवर हल्ला

मूळ उत्तर प्रदेशातील सुदाम बनेरिया हा तरुण पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. सामनगाव येथील तांबोळी हॉस्पिटलशेजारी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत सुदाम हा पत्नी क्रांती (वय २७) व दोन लहान मुलांसह (Crime News) राहतो.

बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास क्रांती व त्यांचा भाचा अभिषेक सिंग (वय २२) हे दोघे घरात एकटे होते. यावेळी अज्ञात इसमांनी घरात घुसून क्रांतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून (Nashik News) केला. तसंच अभिषेकवर वार करून गंभीर जखमी केले.

पोलीस तपास सुरू

गळ्यावर वार झाल्यामुळं क्रांती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी अवस्थेत अभिषेक आरडाओरडा करत बाहेर आला. त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव (Nashik Crime News) घेतली. घटनेची माहिती मिळतच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

अभिषेकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला व कोणी केला, याचा तपास नाशिक रोड पोलीस करत आहे. या घटनेमुळं परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत (Latest Crime News) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com