रामनाथ ढाकणे
पती पत्नीमध्ये वाद होण्याच्या घटना काही नवीन नाही. परंतु अनेकदा हे वाद टोकाला पोहोचतात आणि भयंकर घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) समोर आली आहे. पती पत्नीच्या भांडणात जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)
पती पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पत्नी माहेरी निघून गेली. पत्नीला पुन्हा घरी नेण्यासाठी आलेल्या जावयाचा सासऱ्याशी वाद झाला. संतापलेल्या जावयाने सासऱ्यावर चाकूहल्ला (Son In Law Killed Father In Law) केला. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला, ही घटना शनिवारी रात्री चिकलठाणा येथे घडली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी आरोपी जावयास अटक केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नक्की काय आहे प्रकरण?
दारू पिऊन पती मारहाण करत असल्याने पत्नी माहेरी निघून गेली. तिला घ्यायला पती तिच्या माहेरी गेला. परंतु सासऱ्याने मुलीला तिच्या सासरी पाठविण्यास नकार ( Crime News) दिला. त्यामुळे संतापलेल्या जावयाने सासऱ्याचा चाकूने भोसकून (Knife Attack) खून केल्याची घटना चिकलठाणा येथील धनगर गल्लीत घडली आहे.
या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी जावयास अटक केली आहे. दत्ता रामराव पाटोळे (३६, रा. पीरबावडी, ता. फुलंब्री) असं संशयित जावयाचं तर सूर्यभान फकीरचंद रिठे (५२, रा. चिकलठाणा) असं खून झालेल्या सासऱ्याचं नाव आहे.
सासऱ्याच्या पोटात चाकूने वार
आरोपीचा मेहुणा योगेश यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानी पोलिसांना सांगितलं की, आरोपी त्याच्या बहिणीला सतत त्रास देत (Sambhajinagar News) होता. त्यामुळे सुनीताचे वडील सूर्यभान यांनी तिला दीड महिन्यापूर्वी माहेरी आणलं होतं.
त्यानंतर दत्ताने नातेवाइकांसह शनिवारी सासऱ्याचं घर गाठलं. नातेवाइकांच्या उपस्थितीत बैठक झाली. वाद होऊन सासऱ्याने जावयास हाकलून दिलं. रागाच्या भरात जावयाने सासऱ्याच्या पोटात चाकूने वार (Sambhajinagar Crime News) केले. या हल्ल्यात सूर्यभान फकीरचंद रिठे गंभीर जखमी झाले अन् त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक गौतम पातारे अधिक तपास करीत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.