Kalyan Police: तक्रात दाखल करण्यासाठी जात असतानाच गाठलं अन् चाकूने केले वार, उल्हासनगर हत्या प्रकरणात ६ जणांना अटक

Kalyan Police News: गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या एका तरुणाच्या हत्या प्रकरणात उल्हासनगरातील मध्यवर्ती ठाण्याच्या पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवून आणि विविध ठिकाणी ८ तास छापेमारी करून ६ आरोपींची धरपकड केली आहे.
Kalyan Police
Kalyan PoliceSaam Digital
Published On

Kalyan Police

गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या एका तरुणाच्या हत्या प्रकरणात उल्हासनगरातील मध्यवर्ती ठाण्याच्या पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवून आणि विविध ठिकाणी ८ तास छापेमारी करून ६ आरोपींची धरपकड केली आहे. आज या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कष्ठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ येथील इमलीपाडा परिसरात राहणाऱ्या राहुल जयस्वाल हा २५ वर्षीय तरुणाचे याच भागात राहणाऱ्या बाबू ढकणी आणि त्याच्या साथीदारांसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरु होते. याच वादातून बाबू ढकणी याने नोव्हेंबर २०२२ मध्ये राहुल याची दुचाकी देखील जळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी बाबूला अटक केली होती.त्यामुळे या दोघांमधील संघर्ष टोकाला गेला होता.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास बाबू ढकणी याच्यासह बसंत ढकणी, प्रणय शेट्टी, करण ढकणी, संतोष साळवे, प्रफुल कुमावत, रॉबिन करोतिया यांनी राहुलच्या घरावर दगडफेक केली.आणि दुचाकी जाळल्याची पोलीस ठाण्यात केलेली तक्रार मागे घेतली नाही तर जीवे ठार मारणार अशी धमकी दिली. राहुलने नकार दिला आणि तो मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असतानाच आरोपींनी राहुल याला गाठून बेदम मारहाण केली.तसेच त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे आणि चाकूने वार करून डोक्यात लादी टाकली.यात राहुलचा जागीच मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Police
Abhishek Ghosalkar Case Update: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट, मॉरिस नोरोन्हाच्या बॉडीगार्डला अटक

या प्रकरणात पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे,सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे यांच्या टीमने तत्परतेने विविध ठिकाणी आठ तासाची छापेमारीची मोहीम राबवून बाबू ढकणी याच्यासह बसंत ढकणी, प्रणय शेट्टी,करण ढकणी,संतोष साळवे,प्रफुल कुमावत या आरोपींची धरपकड केली.या प्रकरणातील एकमेव आरोपी रॉबिन करोतिया हा फरार असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे करत आहेत.

Kalyan Police
Nagar News : विविध मागण्यांसाठी हजारो वकिलांचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com