कोलकाता येथे भयंकर घटना घडली आहे. ४१ वर्षीय पतीनं आपल्या पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजता त्याने पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवलं. घरातील सर्व कामे उरकून तो झोपी गेला. सकाळी पुन्हा लवकर उठून आपल्या मुलांसाठी त्यानं नाश्ता केला आणि त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोलकाता येथील बेहाला (Behala) येथील ४१ वर्षीय कार्तिक दास यानं गुरुवारी पत्नीची गळा आवळून हत्या केली. रात्री एक वाजता ही घटना घडली. (Crime News) मात्र, त्याच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप दिसत नव्हता. त्यानं हत्येनंतर तिचा मृतदेह गुंडाळून ठेवला. रात्री घरातील सर्व कामे उरकली आणि शांत झोपी गेला. सकाळी लवकर उठून मुलांसाठी नाश्ता तयार केला. त्यांना क्लासला पाठवून दिलं. त्यानंतर साधारण साडेनऊच्या सुमारास १०० क्रमांक डायल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. मी तुमची घरीच वाट बघत आहे, असं कार्तिकने पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलिसही हादरून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) तात्काळ कार्तिकच्या घरी पोहोचले. त्यावेळीच त्याने सासूला फोन करून मुलांना क्लासमधून घरी घेऊन जा असं सांगितलं.
पोलीस घरी पोहोचले त्यावेळी कार्तिक पत्नीच्या मृतदेहाजवळ अगदी शांतपणे बसला होता. पोलिसांनी त्याला याबाबत विचारलं. पत्नीची हत्या केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, कार्तिक दुकान आणि मटण शॉप चालवतो. पत्नीचे अनैतिक संबंध (extra marital affair) असल्याच्या संशयावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यात पुन्हा भांडण झालं होतं. हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात कार्तिकने तिची गळा आवळून हत्या केली. तुमच्या आईची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ती झोपी गेली आहे, असं त्यानं मुलांना सांगितलं होतं.
या घटनेची आम्ही आणखी खोलात जाऊन चौकशी करत आहोत. पत्नीची हत्या करण्यापूर्वी आरोपीने मुलांना सासूच्या घरी सोडल्याची शक्यता आहे. तसेच पोलिसांना फोन करून माहिती देण्यापूर्वी त्याने रात्रीच सर्व पुरावे नष्ट केल्याचा संशय आहे.
पोलिसांनी (Police) घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर महिलेचा मृतदेह रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कार्तिक आमची मुलगी समाप्तीचा छळ करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आम्ही शेजाऱ्यांचे आणि घरमालकाचा जबाब नोंदवून घेतला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.