Murbad Crime News : ७५ वर्षीय वृद्ध आजोबांना पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालवलं; धक्कादायक घटनेनं मुरबाडमध्ये खळबळ

Crime News : 4 मार्च रोजी रात्री केरवेळे गावात जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागरणाचा गोंधळ सुरू असताना 15 ते 20 जण लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसले.
Murbad Crime News
Murbad Crime NewsSaam TV

फय्याज शेख

Murbad News :

मुरबाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भूताटकीच्या संशयातून एका 75 वर्षीय वृध्दाला निखाऱ्यावरून धावण्यास सांगितले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावातून संताप व्यक्त होत आहे.

Murbad Crime News
Murbad Shocking News : पार्किंगच्या वादातून कोयत्यानं हल्ला, मुरबाड भागातील धक्कादायक घटना,पाहा व्हिडीओ

4 मार्च रोजी रात्री केरवेळे गावात जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागरणाचा गोंधळ सुरू असताना 15 ते 20 जण लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसले. त्यांनी या 75 वर्षीय आजोबांना घरातून ओढत जागरणाच्या ठिकाणी आणले. त्यानंतर या सर्वांनी क्रूरतेचा कळस गाठला. आजोबांसोबत त्यांनी निर्यदयीपणे अघोरी कृत्य केलं.

जिथे गोंधळ सुरू होता त्या ठिकाणी आग पेटवण्यात आली होती. या आगीवर असलेल्या निखाऱ्यांवर आजोबांचे हात पाय धरून त्यांना चालण्यास भाग पाडण्यात आले. हे आजोबा करणी करतात असं म्हणत त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे.

जळत्या निखाऱ्यांवर चालवल्याने आजोबांच्या पायांना पोळले आहे. तसेच त्यांच्या पाठीला आणि पायांना मोठे फोड आले आहे. आजोबांना मारहाण देखील झाली त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत लक्ष्मण भावार्थे यांच्या मुलीने मुरबाड पोलीस स्टेशन गाठले असून अद्यापही या व्यक्तींविरोधत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सदर घटनेमुळे माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे की नाही? एखादी व्यक्ती एवढी निर्दयी कशी असू शकते? असे प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच पोलीसनाने आद्याप यावर कोणतीही कारवाई न केल्याने प्रशासन आणखी काही मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल आजोबांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.

Murbad Crime News
Pune Crime News : पुण्यातील बावधनमध्ये महिलेचा खून, पाेलिसांचा पतीवर संशय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com