Nephew Killed Aunt : शरीर सुखाच्या मागणीला नकार दिला; एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामीला संपवलं

Nashik crime news : नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये भाच्याने मामीची हत्या करत स्वत:वरही वार केले.
Nashik Road Crime
Nashik Road CrimeSaam Tv
Published On

तबरेज शेख, नाशिक

Nashik Crime News :

नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये भाच्याने मामीची हत्या करत स्वत:वरही वार केले. सध्या भाच्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये बुधवारी नाशिक रोड परिसरातील सामनगाव येथील एकलहरे रोडवर क्रांती बनेरिया या महिलेची तिच्या पतीता भाचा अभिषेक सिंगने एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक प्रकार केला आहे. त्यानंतर भाच्याने सदरचा प्रकार उघडकीस येऊ नये आणि मामीची हत्या दुसऱ्या व्यक्तीने केल्याचा बनाव रचला. त्यासाठी भाच्याने स्वत: च्या गळ्यावर चाकूने वार केले. या घटनेत अभिषेक गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही.

Nashik Road Crime
Mulshi Crime: मुलीच्या लग्नासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, तब्बल साडे ७ लाखांचा ऐवज लंपास; मुळशीत खळबळ

अभिषेक धक्कादायक पाऊल का उचचलं?

अभिषेक सिंग हा मामी क्रांती बनेरियावर एकतर्फी प्रेम करत होता. तो मामीकडे नेहमी शरीर सुखाची मागणी करत असायचा. मात्र , मामी नकार देत होती. याच कारणावरून अभिषेक सिंग याने बुधवारी रात्री क्रांती बनेरिया हिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली.

Nashik Road Crime
Pimpri Chinchwad Crime News : सोनसाखळी चाेरट्यांना अटक, एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून पाच गुन्हे उघडकीस

दरम्यान, या घटनेचा नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक सुखदेव काळे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हवालदार जय दीपक सोनार, विष्णू गोसावी, विजय टेमगर, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, दत्तात्रय वाजे, योगेश रानडे, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरुण गाडेकर, संतोष पिंगळे, महेंद्र जाधव, भाऊसाहेब नागरे, कल्पेश जाधव यांनी या घटनेची सखोल चौकशी केली.

या चौकशीनंतर संशयित आरोपी हा अभिषेक सिंग असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेप्रकरणी मृत महिला क्रांती बनेरिया हिचा पती सुदाम मनेरिया यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या घटनेनुसार पोलीस पुढील तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com