Kolhapur Crime News: धक्कादायक! दारूच्या नशेत तरूणाने केली मित्राची हत्या, कोल्हापुरमधील घटना

Youth Killed Friend In Rajarampuri: दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणाने मित्राची हत्या केली आहे.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime NewsSaam Tv

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही कोल्हापूर

दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणाने मित्राची हत्या केली आहे. कोल्हापुरमधून ही खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक (Kolhapur Crime News) करण्यात आलेली आहे. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर घटनास्थळी दहशतीचं वातावरण आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. दारूच्या नशेत ही घटना घडली आहे.

दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयिताने मित्राचा गळा आवळून अमानुषपणे खून केली आहे. ही घटना राजारामपुरी येथे सातव्या गल्लीत घडली. ही घटना रविवारी पहाटे घडली (Youth Killed Friend) आहे. दिनेश अशोक सोळांकूरकर, असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित संगमेश अशोक तेंडुलकर यास अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दिनेश अशोक सोळांकूरकर आणि संगमेश अशोक तेंडुलकर हे दोघे मित्र होते. या दोघांनी रविवारी मध्यरात्री मद्य प्राशन केलं होतं. त्यावेळी नशेत या दोघांमध्ये वाद झाला. किरकोळ कारणावरून (Kolhapur News) सुरू असलेला वाद टोकाला गेला. संतापलेल्या तरूणाने गळा आवळून मित्राचा खून केला. या खून प्रकरणामुळे राजारामपुरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime News
Akola Crime News: प्रेमात अडसर ठरत होती बायको; नवऱ्याने गाठला विकृतीचा कळस, मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

हे दोघेही जिवलग मित्र असल्याची माहिती मिळतेय. रविवारी मध्यरात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाले होते. दारूच्या नशेत विपरीत घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली (Crime News) आहे. पहाटे सहा वाजता संशयिताने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिल्याचं समोर आलं आहे. तसंच संशयित दोन तास मृतदेहाजवळ बसुन असल्याची माहिती मिळत आहे.

Kolhapur Crime News
Uttar Pradesh Crime News: एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; युवकाने आई-बायको आणि ३ मुलांना संपवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com