कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

Kolhapur Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात तरन्नुम नाईक या तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अपहरण करून दरीत ढकलल्याचा आरोप असून, या प्रकरणी श्रीपाद वडर याला पोलिसांनी अटक केली आहे.
Kolhapur crime news boyfriend accused of pushing woman into gorge
Kolhapur crime news boyfriend accused of pushing woman into gorge
Published On: 
Summary
  • कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात तरुणीच्या मृत्यूची धक्कादायक घटना.

  • तरन्नुम नाईक असे मृत तरुणीचे नाव; ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती.

  • विवाह दुसऱ्या व्यक्तीशी ठरल्यानंतर तरुणीच्या हत्येचा आरोप

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

प्रेयसी दुसऱ्यासोबत लग्न करणार असल्याची माहिती होताच प्रियकरानं तिचा खून केल्याच्या घटनेने कोल्हापुर हादरलंय. प्रियकराने प्रेयसीचं अपहरण करत तिला एका खोल दरीत ढकलून देत तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात घडलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील श्रीपाद वडर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. तर मृत प्रेयसीचं नाव तरन्नुम नाईक होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी येथे ही घटना घडली. तरन्नुम नाईक ही अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होती. तिचा विवाह ठरल्यामुळे प्रियकर श्रीपाद वडर याने तिचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तिला दरीत ढकलण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी श्रीपाद वडर याला अटक केली असून, भुदरगड पोलीस ठाण्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

Kolhapur crime news boyfriend accused of pushing woman into gorge
बाचाबाची झाली, राग टोकाला गेला; बँक मॅनेजरनं कमरेत लाथ घातली, बँक अधिकारी थेट जमिनीवर कोसळला, CCTV फुटेज व्हायरल

मृत तरुणी आणि संशयित आरोपी श्रीपाद वडर यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तरुणीचे लग्न तिच्या घरच्यांनी ठरवले होते. आता आपले प्रेमसंबंध तुटणार. ती दुसऱ्याशी विवाह करणार याचा राग श्रीपादला आला होता याच रागातून त्याने तिच्या हत्येचा कट रचल्याचं सांगितलं जातंय. श्रीपादने आपल्या कटानुसार संधी साधून तरुणीचे अपहरण केलं. त्यानंतर तिला भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरातील एका निर्जन भागात नेले. तिथे दोघांमध्ये वाद झाला.

Kolhapur crime news boyfriend accused of pushing woman into gorge
समृद्धी महामार्ग बनतोय गांजा तस्करीचा मार्ग? दोन ट्रकमधून 350 किलो गांजा जप्त, वाशिम पोलिसांची मोठी कारवाई

त्याचदरम्यान आरोपीने तिला खोल दरीत ढकलून दिले. खोल दरीत कोसळल्यामुळे तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागेवर मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भुदरगड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कसून चौकशी सुरू केली असता, संशयित प्रियकर श्रीपाद वडर याने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com