

जळगावमध्ये जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार
तरुणाने काकाची केली हत्या
डोक्यावर लाकडी काठीने केला हल्ला
आरोपीला पोलिसांनी केली अटक
जळगावमध्ये तरुणाने काकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जमिनीच्या जुन्या वादातून सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाच्या डोक्यात लाकडी काठीने जबर प्रहार करून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील गारखेडा येथे उघडकीस आली. हत्या केल्यानंतर हा प्रकार अपघाती मृत्यू भासविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह जवळील नाल्यात फेकून दिला होता. मात्र रावेर पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपी पुतण्याला बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलिस ठाण्यांतर्गत पाल दूरक्षेत्रच्या हद्दीतील गारखेडा गावातील रामा बारेला यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. गारबर्डीच्या पोलिस पाटलांनी २१ जुलै रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती रावेर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी मृतदेहाच्या डोक्याला उजव्या बाजूला गंभीर जखम असल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मृत रामा बारेला यांचा सख्खा पुतण्या अनिल बारेला याच्यावर संशय बळावला. गेल्या ५-६ दिवसांपासून जमिनीच्या वादावरून अनिल हा आपल्या काकाशी सतत वाद घालत होता आणि शिवीगाळ करत होता.
२१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घराजवळ पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात अनिलने लाकडी काठीने काका रामा बारेला यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा वार इतका भीषण होता की रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.