

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात धक्कादायक सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे.
40 वर्षीय महिलेला जंगलात नेऊन सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी अत्याचाराचा कथित व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. तालुक्यामधील कापूसवाडी गावाजवळील जंगलात एका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडलीय. नराधमांनी अत्याचार करताना पीडितेचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणात पोलिसांनी 14 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित 40 वर्षीय महिला कापूसवाडी जवळील जंगलात तिच्या ओळखीच्या काही तरुणांसोबत बसलेली होती. त्यावेळी इतर काही तरूण तेथे आले आणि त्यांनी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी या दोघांनी महिलेवर जबरदस्तीने आळीपाळीने अत्याचार केला.
दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता जळगावचे पोलीस अधीक्षक (SP) श्रीकांत धिवरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत कठोरपणे करण्याचे आणि सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत
हा अत्याचार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी पीडितेची मदत करण्याऐवजी अत्याचाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. इतकेच नव्हे, तर तो व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल देखील केला. ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या संपूर्ण प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत दोन मुख्य आरोपींसह (युसूफ तडवी आणि अशपाक तडवी) आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.