Molestation Case: 'तुला मूलबाळ होत नाही; मी तुला...; विदर्भातील भाजप नेत्याकडून महिलेचा विनयभंग

Molestation Case Filed Against BJP Leader: चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथील भाजपचे सरचिटणीस भानेश येग्गेवार यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय.
Molestation Case Filed Against BJP Leader:
VIDARBHA BJP LEADER BOOKED IN MOLESTATION CASEsaam tv
Published On
Summary
  • भाजपचे महामंत्री भानेश येग्गेवार यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

  • १९ वर्षीय विवाहित महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

  • या घटनेमुळे विदर्भातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विदर्भातील एका भाजप नेत्याविरोधात विनयभंगाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोंडपिपरी तालुका भाजपचे महामंत्री भानेश येग्गेवार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच भाजप नेता फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Molestation Case Filed Against BJP Leader:
Bribe Case: महिला पोलीस अधिकाऱ्याने २५ हजाराची लाच मागितली; गुन्हा दाखल होताच Suspend,पोलीस दलात खळबळ

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे साळूच्या १९ वर्षीय पत्नीचा विनयभंग करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न भानेश येग्गेवार यांनी केला होता. येग्गेवार याची पत्नी माजी पंचायत समिती सभापती होत्या. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार २१ जून रोजी भंगाराम तळोधी येथील भानेश येग्गेवार यांच्या शेतात कापूस बियाण्यांची पेरणी सुरू होती.

Molestation Case Filed Against BJP Leader:
Crime: पोलिस अधिकाऱ्याची महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी, शिवीगाळ केल्याने शिंदेसेनेच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा

बियाणे संपल्याने ते आणण्यासाठी तक्रारदार महिला आणि भानेश येगेवार हे गावातील साळूच्या घरी गेले. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून तुला वर्षभरापासून मूलबाळ होत नाहीये. मी तुला मूलबाळ करून देतो, असे म्हणत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिला कुणाला काही सांगितली तर तुझी बदनामी करेन अशीधमकी आरोपीने दिली.

त्यानंतर आरोपी तेथून निघून गेल्यानंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली. परंतु पीडित महिलेला स्थानिक मराठी भाषा अवगत नसल्याने तिला तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि पाहुण्यांच्या मदतीने अखेर २७ जून रोजी तिने गोंडपिपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत गोंडपिपरीचे पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com