Raja Raghuvanshi : मला सोनमशी लग्न नाही करायचं, कारण तिला...राजा रघुवंशीने दिलेला नकार; मग लग्न झालं कसं?

Indore Couple Missing In Meghalaya : इंदौरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रगघुवंशी हत्येचा उलगडा झाला आहे. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी सोनम रघुवंशीनेच सुपारी देऊन त्यांची हत्या करवली.
Indore Couple Missing In Meghalaya
Indore Couple Missing In MeghalayaSaam TV News
Published On

इंदूर : इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रगघुवंशी हत्येचा उलगडा झाला आहे. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी सोनम रघुवंशीनेच सुपारी देऊन त्यांची हत्या करवली. सोनम आणि राजा यांची ओळख १ ऑक्टोबर २०२४ रोजी समाज परिचय पुस्तिकेद्वारे झाली होती. लग्नानंतर हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या राजाची हत्या झाली, तर १५ दिवसांपासून बेपत्ता असलेली पत्नी सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केलं.

सोनमचे वडील देवी सिंह यांनी सांगितलं की, 'रामनवमीच्या दिवशी आमच्या समाजाचा भंडारा असतो. त्या दिवशी लग्नासाठी योग्य मुला-मुलींची नावे घेतली जातात, जेणेकरून ती सोसायटीच्या ओळखपत्रात प्रकाशित करता येतील. त्या दिवशी आम्ही आमच्या मुलीचं नाव नोंदवलं होतं आणि राजाच्या कुटुंबानेही. त्यावेळी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. जेव्हा पुस्तिका प्रकाशित झाली तेव्हा आम्ही सर्व मुलांची माहिती पाहिली. आम्हाला राजाचे कुटुंब आवडलं. ते देखील इंदूरचे असल्यानं, आम्ही स्वतःहून त्यांच्याबद्दल माहिती गोळा केली'. राजाच्या आई उमा रघुवंशी म्हणाल्या, 'आम्हाला सोनमच्या कुटुंबाचा फोन आला. ते आमच्या घरी आले. त्यांना स्थळ योग्य वाटलं आणि त्यांनी आम्हाला मुलगी बघायला बोलावलं. हे पूर्णपणे अरेंज मॅरेज होतं. दोन्ही कुटुंबं या नात्यानं खूश होती. दोघांनीही कोणत्याही दबावाशिवाय लग्न केलं.'

Indore Couple Missing In Meghalaya
मोठी बातमी! मुंबईला येणाऱ्या मालवाहू जहाजात भीषण स्फोट, ५० कंटेनर समुद्रात कोसळले; ४ क्रू मेंबर्स बेपत्ता

राजाच्या आईने सांगितलं की, 'लग्नानंतर सोनम ११ ते २० मे पर्यंत रघुवंशी कुटुंबासोबत होती. सोनमने घरी शिलाँगला जाण्याचा विषय काढला होता, पण राजाने नकार दिला.' नंतर राजा म्हणाला, 'सोनमने तिकीट काढलं आहे, आता मी काय करू?' 'सहा-सात दिवसांची टूर होती, म्हणून मी त्यांना जायला सांगितलं. निघण्याच्या एक दिवस आधी ते खरेदीला गेले होते, पण त्यांनी परतीचे तिकीट बुक केले नव्हतं,' असं राजाची आई म्हणाली.

राजाची आई म्हणाली की, 'सोनम फोनवर बोलत नसे. राजा एकदा सोनमसोबत चित्रपट बघायला जाणार होता, तेव्हा सोनमच्या आईने नकार दिला. त्या म्हणाल्या की, 'आमच्याकडे असं चालत नाही' राजाच्या आईने सांगितलं की, 'एकदा सोनम राजाशी फोनवर बोलली होती. त्यानंतर राज म्हणाला 'की तिला माझ्यात इंटरेस्ट नाहीये, मी लग्न नाही करत' त्यानंतर राजाच्या आईने सोनमशी बोलून तिची अडचण विचारली. सोनम म्हणाली की, 'मी ऑफिसच्या कामात व्यस्त होते' मात्र त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरु झाल्याचं राजाच्या आईनं सांगितले.

Indore Couple Missing In Meghalaya
Raja Raghuvanshi Postmortem Report : राजा रघुवंशी केसमध्ये मोठी अपडेट, पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, शरीरावर जखमांच्या खुणांसह धक्कादायक खुलासे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com