
तिरुअनंतपुरम : केरळच्या किनाऱ्याजवळ कंटेनर असलेल्या जहाजाचा मोठा अपघात झाला आहे. समुद्रात कंटेनर वाहतूक करणाऱ्या सिंगापूरचा ध्वज असलेल्या 'MV WAN HAI 503' या कंटेनर जहाजात स्फोट झाला. हा स्फोट कोचीपासून सुमारे ३१५ किमी पश्चिमेला समुद्रात असलेल्या जहाजाच्या अंडर डेकमध्ये झाला. या स्फोटात चार क्रू मेंबर्स बेपत्ता झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. जहाजावर एकूण २२ क्रू मेंबर्स होते आणि हे जहाज कंटेनर्सनी भरलेलं होतं.
स्फोटानंतर बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे. घटनास्थळी भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने तात्काळ मदतीसाठी रवाना झाले. या स्फोटामुळे ५० कंटेनर समुद्रात पडले असल्याचं सांगण्यात आलं असून, जहाजावर एकूण ६०० पेक्षा जास्त कंटेनर होते. नौदलाने आपल्या जहाजांसोबत तटरक्षक दलाची तीन जहाजे घटनास्थळी पाठवली आहेत.
स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय, परंतु कंटेनरच्या आतूनच स्फोट झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय नौदलाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, 'कोझिकोडच्या बेपोर किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजात स्फोट झाला आहे. हे जहाज सिंगापूरचे ध्वज असलेले कंटेनर जहाज आहे, ज्याची लांबी २७० मीटर आणि ड्राफ्ट १२.५ मीटर आहे. हे जहाज ७ जून रोजी कोलंबोहून मुंबईसाठी निघाले होते.'
बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध सुरू असून, जखमींना तात्काळ प्रथमोपचार दिले जात आहेत. तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान आणि जहाजे घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. तसेच, घटनास्थळी सर्व मदत पुरवली जात आहे. तटरक्षक दलाने घटनावर लक्ष ठेवून बचाव कार्य सुरू केले आहे. याशिवाय, जहाजावरील उर्वरित क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे म्हटलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.