Mumbai Local Accident : धोकादायक वळण, ६००० प्रवासी, लोकल एका बाजूला झुकली; प्रवासी संघटनेनं मांडलं वास्तव

Mumbai Local Train Accident Mumbra : मुंब्राच्या वळणाबद्दल आधी सुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. कारण, येथील वळणावर रेल्वे एका बाजूला झुकते, एका लोकलमध्ये ३ हजार ६०० प्रवासी प्रवास करतात.
Mumbai Local Train Accident Mumbra
Mumbai Local Train Accident MumbraSaam Tv News
Published On

मुंबई : राजधानी मुंबईतील लोकलचा प्रवास म्हणजे जीव मुठीत धरुन जगणं होय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दररोज या लोकलने प्रवास करतात. साधारण, १५०० प्रवाशांची मर्यादा असलेल्या लोकमधून गर्दीच्या वेळी, कार्यालयीन वेळात तब्बल ५ हजार ते ६ हजार प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. आज सकाळी झालेल्या अपघातातही अशीच स्थिती होती. त्यामुळेच, रेल्वे प्रवासी संघटनेनं मुंब्रा येथील रेल्वे ट्रॅकच्या धोकादायक वळणाचं वास्तव सांगितलं आहे. येथील वळणावर रेल्वे एका बाजुला झुकते, तब्बल ६ हजार प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असल्याने ट्रेन ओव्हरलोड होऊन एका बाजुला झुकते, असं रेल्वे प्रवासी संघटनेच्या सिद्धेश देसाई यांनी सांगितलं.

मुंब्राच्या वळणाबद्दल आधी सुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. कारण, येथील वळणावर रेल्वे एका बाजूला झुकते, एका लोकलमध्ये ३ हजार ६०० प्रवासी प्रवास करतात. मात्र, पिक अवरमध्ये एका लोकलमधील संख्या ६ हजार पेक्षा जास्त होते. जेव्हा ही संख्या जास्त होते तेव्हा लोकलमध्ये लोड येऊन ती एका बाजूला झुकते, असं रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी म्हटलं आहे. आम्ही दिवा ते ठाण्यादरम्यान रेल्वे संख्या वाढवा हे वारंवार सांगतोय, पंतप्रधानांनी सुद्धा ही मागणी मान्य केली होती. मात्र, त्यावर कुठल्याही प्रकारे रेल्वे प्रशासनानं काम केलं नाही. जे वळण निर्माण झालं आहे, त्यावर इंजिनियर सुद्धा काही करू शकत नाहीत, असंही देसाई यांनी म्हटलं. मात्र, हे धोकादायक वळण प्रवाशांसाठी जीवघेणं आणि रेल्वे अपघाताला निमंत्रण देणारं ठरत आहे हे वास्तव आहे.

Mumbai Local Train Accident Mumbra
Pune Shocking : पुण्यात आणखी एक 'वैष्णवी'; हुंड्यासाठी जीवघेणा छळ, २३ वर्षीय विविहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य

मुंब्रा लोकल ट्रेन दुर्घटनेसंदर्भात प्रवासी संघटनांकडून मध्य रेल्वेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रवासी संघटनांना गेल्या वर्षभरापासून भेटीची वेळ दिली गेली नसल्याचेही त्यांनी म्हटलं. रेल्वेकडून रेल्वे आणि ट्रॅकवर खर्च न करता अमृत योजनेअंतर्गत स्थानकांवर अधिक खर्च केला जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या जीएमकडून मिटिंगची वेळ मागणार, वेळ न दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे.

Mumbai Local Train Accident Mumbra
Accident News : भरधाव वाहनाची ट्रकला धडक, गाडीचं छप्पर उडालं, पुण्यात MPL बघायला आलेल्या जळगावच्या दोन मुलांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com