Gondia Crime: उधारीवरुन वाद... कुऱ्हाडीने वार करत तरुणाची निर्घृण हत्या; गोंदिया हादरलं

Crime News in Marathi: चहा टपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार कुडवा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी संतोष मानकर याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Gondia Crime
Gondia CrimeSaamtv
Published On

हरिष मोटघरे, गोंदिया|ता. ७ डिसेंबर २०२४

Gondia Crime News:

पुणे शहरात कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चहा टपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार कुडवा येथे उघडकीस आला आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चहा टपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया (Gondia) शहरालगत असलेल्या कुडवा येथे उघडकीस आला आहे. ईश्वर उर्फ मनिष भालधारे (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संतोष मानकर असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी संतोष मानकर यांचे कुडवा येथे चहा नाश्त्याचे दुकान आहे. ईश्वर उर्फ मनीष भालाधरे याच्याकडे आरोपी संतोष मानकर यांचे काही पैसे उधारी होते. जेव्हा संतोष मानकर त्याला पैसे मागायचा तेव्हा ईश्वर उर्फ मनीष त्याला धमकी देत होता. काल रात्री (शनिवार, ६ डिसेंबर) याच उधारीच्या पैशातून दोघांमध्ये वाद झाला.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gondia Crime
Bhandara Fire News: उंदरानं दिव्याची वात पळवली अन् घरात आग लागली; मौल्यवान साहित्य जळून खाक

याच रागाच्या भरात आरोपी संतोष याने कुऱ्हाडीने मनीष भालाधरे याच्यावर हल्ला करत निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी संतोष मानकर याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Gondia Crime
Pune MNS News : पुण्यात मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com