Sharad Mohol News: शरद मोहोळ हत्याप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी, २ वकिलांचाही सामावेश

Sharad Mohol case update: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. शरद मोहोळच्या हत्या प्रकरणातील ६ आरोपींना ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Sharad Mohol Case Update News
Sharad Mohol Case Update NewsSaam Tv
Published On

Sharad Mohol Case:

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. शरद मोहोळच्या हत्या प्रकरणातील ६ आरोपींना ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणात २ वकिलांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह ६ आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २ वकिलांना केवळ ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल दुपारी पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या झाडून हत्या केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Mohol Case Update News
Who is Sharad Mohol: शरद मोहोळ कोण होता?

या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील ८ आरोपींपैकी २ आरोपी वकील आहेत. या वकिलाकंडून आज कोर्टात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला. आम्ही सहा आरोपींचं वकीलपत्र घेतल्याने अटक करण्यात आली असल्याचं वकिलांनी म्हणणं मांडलं आहे.

Sharad Mohol Case Update News
Delhi Crime News: मामाच्या मुलाची तरुणीकडून जाळून हत्या; सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीचं टोकाचं पाऊल

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींची नावे

नामदेव कानगुडे (मामा)

साहिल उर्फ मुन्ना पोळेकर

विठ्ठल गांदले

अमित उर्फ अमर कानगुडे

चंद्रकात शेळके

विनायक गाव्हणकर

ॲड. रवींद्र पवार

ॲड. संजय उडान

Sharad Mohol Case Update News
Kalyan Crime News: पत्नी, मुलांची हत्या...जादा मोबदल्याचं आमिष, हजारो नागरिकांची 400 कोटींची फसवणूक, कल्याणमधील व्यवसायिकाचा प्रताप

पोलिसांनी अशी केली अटक

शरद मोहोळ प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पाठलाग करत शिरवळजवळून ताब्यात घेतलं. या आरोपींकडून तीन पिस्तुल जप्त केली. या पिस्तुलमधून शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी ती पिस्तुल जप्त केली आहे.

या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या २ दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. आरोपींचे शरद मोहोळशी जमीन आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते. या रागातून या आरोपींनी मोहाळला जिवे मारण्याचा कट रचला होता, अशी माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com