Crime : फ्लॅटवर आला, बेशुद्ध केलं अन्... इंजिनिअरींगच्या विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं, वर्गमित्राला अटक

Crime News : पश्चिम बंगालमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी आहे. अशातच इंजिनिअरींगच्या विद्यार्थिनीवर वर्गमित्राने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Crime
Crimex
Published On
Summary
  • इंजिनिअरींगच्या विद्यार्थिनीवर तिच्या वर्गमित्राने अत्याचार केला.

  • आरोपीने बेशुद्ध करुन गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.

  • घटनेनंतर लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Shocking : काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच कोलकातामध्ये विद्यार्थिनीवर वर्गमित्राने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या वर्गमित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामधील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गमित्राने अत्याचार केले. आनंदपूर पोलिस ठाण्यात तिच्या वर्गमित्रविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कोलकाता शहराच्या दक्षिणेकडील आनंदपूर परिसरात आरोपी तरुणाला अटक करण्यात आली.

Crime
Politics : निवडणुकीपूर्वी महाआघाडीत फूट! जागावाटपावरून अंतर्गत वाद, मित्रपक्षाने सोडली साथ

आरोपीने मला गुंगीचे औषध असलेले पेय पाजले, त्यानंतर मी बेशुद्ध पडले, त्याचा गैरफायदा घेत आरोपीने माझ्यावर अत्याचार केला, असा आरोप पीडित विद्यार्थिनीने पोलिसांकडे केला आहे. विद्यार्थिनी आनंदपूर येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. तेथे आरोपी आले, त्याच ठिकाणी ही घटना घडली असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

Crime
Gold Rate : सोन्याच्या दरात होणार विक्रमी घट! कधी विकत घ्यायचं सोनं; वाचा तज्ज्ञ काय म्हणतायत?

पीडित विद्यार्थिनी ही शिक्षणानिमित्त कोलकाता येथे आली होती. ती एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेच्या दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी काही दिवस लपून राहिला, नंतर आनंदपूर येथील त्याच्या घरी परतला, त्यादरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती समोर आली आहे. आरोपीला न्यायालयाने २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Crime
YouTube डाऊन! व्हिडीओ पाहण्यात अडथळे, जगभरातील यूजर्स वैतागले; नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com