
विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या महाआघाडीला धक्का
मित्रपक्षाने साथ सोडली, एआयएमआयएमशी युती करणार असल्याची शक्यता
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाआघाडीमध्ये अंतर्गत वाद पेटल्याची चर्चा
Politics News : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएने जागावाटपाची घोषणा केली. यामुळे महाआघाडीवर जागावाटपासाठी दबाव वाढला असल्याचे म्हटले जात आहे. महाआघाडीत जागावाटपावरून अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच आघाडीतील राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (आरएलजेपी) या मित्रपक्षाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाआघाडीसाठी धक्का मानला जात आहे.
निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (आरएलजेपी) या पक्षाने विरोधकांच्या महाआघाडीसोबत निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. आरएलजेपी पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी याबाबत माहिती दिली. आघाडीऐवजी आरजेएलपी विधानसभा निवडणुका ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाशी युती करुन लढवेल असे पारस यांनी म्हटले.
मागच्या आठवड्यात पशुपती कुमार पारस यांनी राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष हा महाआघाडीचा भाग होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. आरजेएलपी कोणत्या युतीत सामील होणार याचा निर्णय घेत असल्याचे पारस यांनी सांगितले होते. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मित्र पक्षाने साथ सोडल्याने विरोधी पक्षाच्या भूमिकेतील महाआघाडीला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
इंडिया आघाडीने अद्यापही जागावाटपाची सार्वजनिक घोषणा केलेली नाही. असे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांच्यासह पक्षातील काही सदस्यांनी उमेदवारीचे अर्ज भरले. अर्ज भरताना काही ठिकाणी आघाडीतील मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणूका ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहेत. मतदानाला फार कमी कालावधी उरला असल्याने लवकरच महाआघाडीकडूनही जागावाटप जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.