Dombivli Crime: संतापजनक! मदतीसाठी बोलावलेल्या मित्राकडूनच अनाथ तरुणीवर अत्याचार

Orphan Girl Physical Abused : डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्याला मदतीसाठी बोलावले त्यानेच तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे महिलांची सुरक्षा आणि सोशल मीडियावरील संबंधांबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
Orphan Girl  Physical Abused :
Police investigate a shocking assault case in Dombivli involving betrayal by a trusted friend after a Snapchat connection.saam tv
Published On
Summary
  • डोंबिवलीत अनाथ तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना

  • मदतीसाठी बोलावलेल्या मित्रानेच केला विश्वासघात

  • स्नॅपचॅटवरील ओळख ठरली घातक

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

डोंबिवलीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अनाथ तरुणीला तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणीने मदतीसाठी एका मित्राला बोलवलं मात्र त्याच तरुणानेच तिच्यावर अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी डोंबिवलीत राहणारी असून ती एका खाजगी ठिकाणी नोकरी करते. आई-वडील नसल्याने ती एकटीच राहत होती. काही कारणावरून तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर खोटा आरोप करत तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये मैत्रिणीचा वडीलदेखील सहभागी असल्याचे समोर आले आहे.

Orphan Girl  Physical Abused :
मुलीकडून पैशांसाठी तगादा, ७ दिवसांपासून बेपत्ता; टिटवाळ्यातील वयोवृद्ध दांपत्यासोबत काय घडलं? आत्महत्या की घातपात?

मारहाणीनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी सोबत कोणी नसल्याने तरुणीने आपल्या एका मित्राला बोलवलं. काही दिवसांपूर्वी स्नॅपचॅटवर ओळख या तरुणावर मैत्री झाली होती. या मुलाचे नाव क्रिश भोईर आहे. तरुणीने क्रिशला मदतीसाठी बोलावले, मात्र विश्वासघात करत या तरुणाने तिला मानपाडा पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

Orphan Girl  Physical Abused :
Crime News : ट्रेनच्या लोकोपायलटवर गोळीबार, दुचाकीवरून आले होते हल्लेखोर; हल्ल्याचे कारण धक्कादायक

यानंतर तिच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून मोबाईल व पैसे घेऊन तो फरार झाला. घटनेनंतर पीडित तरुणी थेट डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत पोहोचली. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तिच्या मदतीसाठी धावून आले. आमदार राजेश मोरे यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना तत्काळ पोलीस स्टेशनला पाठवले. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या पथकाने अवघ्या एका तासात आरोपी क्रिश भोईर याला अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी प्रियंका सादळकर करत आहेत. दरम्यान आरोपीने याआधीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जातेय. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com