Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Uncle Kills 21-Year-Old Nephew : धारशिवमध्ये जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने आपल्या २१ वर्षीय भाच्याची हत्या केली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.
Uncle Kills 21-Year-Old Nephew :
धाराशिव जिल्ह्यात जमीन वादातून चुलत्याकडून पुतण्याची हत्या, परिसरात खळबळ.
Published On
Summary
  • धाराशिवमध्ये जमीन वादातून नात्यातील खून

  • चुलत्याने २१ वर्षीय पुतण्याची हत्या

  • चाकूने वार करून केला जीवघेणा हल्ला

बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्यानेच पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विलास शेळके असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. त्याने आपल्या पुतण्या सुजित शेळके याच्या पोटावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Uncle Kills 21-Year-Old Nephew :
परवेझनं अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात अडकवलं,८ मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवला; खेडामध्येही अमरावतीसारखा कांड

जमीन व्यवहारातून आरोपी आणि मयत सुजित शेळके यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान सुजित शेळके हा रात्री आपल्या आजी आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपीने येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या बाचाबाचीचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळी आरोपीने चाकूने वार करत सुजित शेळके याची हत्या केली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृत सुजित शेळके यांच्या आईच्या जवाबावरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चुलत्यानेच पुतण्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Uncle Kills 21-Year-Old Nephew :
Shocking : नवरा नाईट ड्युटीवर, घरी सासऱ्याकडून सुनेचा लैंगिक छळ ; खुलताबादमधील धक्कादायक घटना

सख्ख्या बहिणीकडून भावाची हत्या; पंढरपूर हादरले

पंढरपूरमध्ये महिलेने आपल्या सख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना करमाळ्यात घडली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या भावाच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून सख्या बहिणीने नवऱ्याच्या मदतीने त्याची हत्या केली. ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेतामध्ये नेऊन टाकला. या घटनेमुळे पंढरपूर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारी पोपट कांबळे (वय ३८ वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना करमाळा तालुक्यातील केम गावात येथे घडली. या प्रकरणी आरोपी बहीण शितल केंगारे आणि तिचा नवरा राजू केंगारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मल्हारी कांबळेला दारूचे व्यसन होते. ११ एप्रिल रोजी रात्री तो दारू पिऊन घरी आला. यावेळी बहीण शितल आणि त्याच्यात कडाक्याचे भांडण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com