

खेडा जिल्ह्यात अल्पवयीन अत्याचार प्रकरण उघड
९ पैकी ८ आरोपी अटकेत, एक आरोपी फरार
अश्लील व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी विशेष पद्धतीने चॅटिग करायचा आणि त्यांना शिकार बनवत असायाचा असाच एक प्रकार आता गुजरातमधील खेडामध्ये घडला आहे.
खेडा जिल्ह्यातील परवेझ पठाण नावाच्या एका तरुणाने आणि त्याच्या ८ मित्रांनी एका अल्पवयीन हिंदू मुलीवर तीन वर्षे सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अमरावतीमधील अयान मुलींशी ओळख करून त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढत होता. त्याचप्रमाणे खेडामधील परवेझने सुरुवातीला त्या मुलीला प्रेम प्रकरणात अडकवलं होतं. दरम्यान या अत्याचाराप्रकरणी पोलिसांनी ९ आरोपींपैकी ८ जणांना अटक केली आहे, तर ९ वा आरोपी अद्याप फरार आहे.
एफआयआरनुसार, पीडितेचे गेल्या तीन वर्षांपासून सतत शोषण होत होते. हा छळ तीन वर्षांआधी सुरू झाला. मुख्य आरोपी परवेझ पठाणने अल्पवयीन मुलीला प्रेमप्रकरणात फसवले. त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढले.
नंतर त्याने हे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यातून त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. परवेझने हे फोटो आणि व्हिडिओ इतर मित्रांनादेखील पाठवले. यानंतर त्याच्या आठ मित्रांनीही पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. सर्व आरोपींनी व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले.
मनात भीती आणि समाजात बदनामी होईल या दबावामुळे पीडितेनं २०२३ ते २०२५ पर्यंत हा लैंगिक छळ सहन केला. शेवटी या ब्लॅकमेलिंगचा त्रास असह्य झाला तेव्हा तिने आपल्या कुटुंबाला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात हा एक सुनियोजित कट असल्याचे दिसून येते. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.