संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

Buldhana Crime News: बुलढाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
Buldhana Crime News:
Buldhana Crime News: Saam Tv
Published On
Summary
  • बुलढाण्यात प्राथमिक शाळेत धक्कादायक घटना

  • शिक्षकावर विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप

  • गावकऱ्यांचा संताप, आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले

बुलढाणा जिल्ह्याच्या लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळेतील बाल लैंगिक शोषणाच्या घटना सातत्याने घडत आहेत. शाळांमध्ये मुलीवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत असल्याने मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. पालक मुलींना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत.

Buldhana Crime News:
Crime News: हात-पाय बांधले, तोंडात बोळा कोंबला...; १३ वर्षीय मुलीवर ५ जणांचा सामूहिक बलात्कार

लोणी गवळी गावातील हा संतपाजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील एका ९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत ५८ वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. आज सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना कळताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला माराहण केली.

Buldhana Crime News:
Crime: धक्कादायक! कुऱ्हाडीनं वार करत घेतला बायको अन् 8 वर्षाच्या चिमुकलीचा जीव

तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली व पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले होते. मात्र गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास मज्जाव करत होते. गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असताना नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com