बिहारमधील पाटण्यात धक्कदायक घटना
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शरीर संबंध ठेवण्यात आले.
मुलगी गरोदर राहिल्यानंतर जन्मलेल्या बाळाचा सौदा करण्याचा कट
पोलिसांनी वेळीच कारवाई करत नवजात बाळाची सुटका केली
बिहारच्या पाटणामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. यानंतर पीडित मुलगी गरोदर राहून तिने एका मुलाला जन्म दिला. संतापजनक म्हणजे आरोपीने त्याचा सौदा करण्याचा प्लॅन आखला. सुदैवाने पोलिसांच्या तत्परतेने वेळीच कारवाई करून नवजात बाळाला या धर्मसंकटातून वाचवण्यात पोलिसांना यश आलं. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्याच्या गरदानीबाग पोलीस स्टेशन परिसरात ३ मार्च रोजी एक १५ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले होते. पोलीस तपासात समोर आले की, एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून १५ वर्षीय मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर, कट रचून तरुणाने मुलीचे अपहरण केले.
काही दिवसांनी तिची प्रसूती झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर आरोपीने डॉक्टरच्या मदतीने बाळाला विकण्याचा कट रचला. मात्र पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नराधमांच्या तावडीतून बाळाची सुरक्षितरित्या सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या आईसह डॉक्टरला देखील अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.