Crime News: 'चिकनमध्ये मीठ जरा जास्त झालं...', नवऱ्याच्या तक्रारीने बायको चिडली; डोक्यात रॉड घालून पतीला संपवलं

Husband Death Over Excessive Salt In Chicken: चौतरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हुआ गावात घडली. 35 वर्षीय शमशेर आलम उर्फ ​​लालू असे मृताचे नाव आहे.
Crime News: 'चिकनमध्ये मीठ जरा जास्त झालं...', नवऱ्याच्या तक्रारीने बायको चिडली; डोक्यात रॉड घालून पतीला संपवलं
Husband Death Over Excessive Salt In Chicken: Saamtv
Published On

Wife Beats Husband: 'चिकनच्या भाजीत मीठ जरा जास्त झालंय', बायकोकडे केलेली ही तक्रार एका पतीला चांगलीच महागात पडली आहे. नवऱ्याने केलेल्या या तक्रारीनंतर संतापलेल्या बायकोने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली. बिहारच्या चंपारण जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Crime News: 'चिकनमध्ये मीठ जरा जास्त झालं...', नवऱ्याच्या तक्रारीने बायको चिडली; डोक्यात रॉड घालून पतीला संपवलं
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महायुतीत मोठी फूट पडणार? अजित पवार सर्वात मोठा निर्णय घेणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यात भाजीत जास्त मीठ टाकल्याची तक्रार केल्यामुळे पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चौतरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हुआ गावात घडली. 35 वर्षीय शमशेर आलम उर्फ ​​लालू असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शमशेर आलम हा गुजरातमध्ये काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो आपल्या घरी आला. शुक्रवारी त्याने बाजारातून चिकन आणले आणि पत्नी शहनाज बेगमला भाजी करण्यास सांगितली. समशेर जेवायला बसला तेव्हा त्यांच्या बायकोने चिकनची भाजी कशी झाली आहे असं विचारलं. भाजी चांगली झाली आहे मात्र त्यात मीठ जास्त आहे, असं पतीने सांगितले.

Crime News: 'चिकनमध्ये मीठ जरा जास्त झालं...', नवऱ्याच्या तक्रारीने बायको चिडली; डोक्यात रॉड घालून पतीला संपवलं
Crime News: खळबळजनक! दरोडेखोरांच्या हल्ल्यात 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'च्या तालुका अध्यक्षांचा मृत्यू

पतीच्या या तक्रारीने रागावलेल्या शहनाजने लोखंडी रॉड डोक्यात घातला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शेजाऱ्यांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शहनाज आणि तिच्या अल्पवयीन बहिणीला अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, कौटुंबिक हिंसाचार ही एक गंभीर समस्या आहे आणि आपण त्याबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला घरगुती हिंसा होत असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अशा लोकांवर रागावण्यापेक्षा त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा.

Crime News: 'चिकनमध्ये मीठ जरा जास्त झालं...', नवऱ्याच्या तक्रारीने बायको चिडली; डोक्यात रॉड घालून पतीला संपवलं
Sanjay Raut News: विधानसभेआधी भाजपचं प्लॅनिंग.. पहिला बळी अजित पवारांचा, दुसरा शिंदेंचा; संजय राऊतांनी सांगितलं अंतर्गत राजकारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com