Sanjay Raut News: विधानसभेआधी भाजपचं प्लॅनिंग.. पहिला बळी अजित पवारांचा, दुसरा शिंदेंचा; संजय राऊतांनी सांगितलं अंतर्गत राजकारण

Sanjay Raut On Mahayuti Crisis: आज जर पहिला बळी अजित पवार यांचा जाणार असेल तर दुसरा बळी शिंदे गटाचा जाणार हे शंभर टक्के आहे," असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut News: विधानसभेआधी भाजपचं प्लॅनिंग.. पहिला बळी अजित पवारांचा, दुसरा शिंदेंचा; संजय राऊतांनी सांगितलं अंतर्गत राजकारण
Sajay Raut on MahayutiSaam TV
Published On

मयुर राणे, मुंबई|ता. २३ सप्टेंबर

Sanjay Raut On Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्यांना ऊत आला आहे. विधानसभेआधी अजित पवारांना एकटे पाडण्याचा डाव असून भाजप आणि शिंदे गट तशी प्लॅनिंग करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावरुनच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले असून महायुतीमध्ये पहिला बळी अजित पवारांचा तर दुसरा शिंदे गटाचा दिला जाईल, असा दावा करत महायुतीच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"भारतीय जनता पक्ष आणि हा शिंदे गट एक नंबरचे कारस्थाने आणि कपटी लोक आहेत. हे निर्दयी लोक आहेत हे काटा काढतील. अजित पवार यांना दूर लोटण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे त्याच्यात शिंदे गटातील लोक सामील आहेत. अजित पवार गेल्यानंतर जास्त जागा मिळतील, त्यामुळे गरज सरो वैद्य मरो, अशी भाजपची खेळी आहे. त्यामुळेच अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्ये केली जात आहेत आज जर पहिला बळी अजित पवार यांचा जाणार असेल तर दुसरा बळी शिंदे गटाचा जाणार हे शंभर टक्के आहे," असे संजय राऊत म्हणाले.

शिंदेंचे CM पद पैशांच्या जिवावर...

तसेच "एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यत आलं आहे, महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा. शिंदे गटाकडून झारखंड, हरियाणाचाही खर्च करुन घेतला जात आहे. हा खर्च केल्यावर राजाच्या नेतृत्वावर ठेवायचं की नाही याचा निर्णय घेऊ, असं शिंदेंना सांगण्यात आलं आहे. पैशाच्या थैल्या भरुन दिल्लीला द्याव्या लागतात, म्हणजेच शिंदेंचे मुख्यमंत्रीपद हे पैशाच्या जिवावर टिकून आहे," असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut News: विधानसभेआधी भाजपचं प्लॅनिंग.. पहिला बळी अजित पवारांचा, दुसरा शिंदेंचा; संजय राऊतांनी सांगितलं अंतर्गत राजकारण
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महायुतीत मोठी फूट पडणार? अजित पवार सर्वात मोठा निर्णय घेणार?

परिवर्तनाला सुरुवात..

"महाविकास आघाडीचा असा कोणताही अधिकृत सर्वे नाही. हे महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा सर्वे, पक्षांचे, चॅनेल्सचे सर्वे असं काही नाही. अजून निवडणुका जाहीर व्हायचे आहेत. हे जे सर्वे किंवा त्या संदर्भातला अफवा आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सत्ता बदल होतो आणि महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत सर्वेच्या येत असतात, राज्यात कोणत्या भागात काय निकाल लागतो याची आम्हाला खात्री आहे, माहिती आहे," असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut News: विधानसभेआधी भाजपचं प्लॅनिंग.. पहिला बळी अजित पवारांचा, दुसरा शिंदेंचा; संजय राऊतांनी सांगितलं अंतर्गत राजकारण
Ajit Pawar : 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, कार्यकर्त्यांनो कामाला लागा; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com