MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं

Sharad Pawar Slams Sanjay Raut : एका कार्यक्रमात बोलतांना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यावरून मविआत वाद उफाळून आलाय.
MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं
Sharad Pawar Slams Sanjay RauSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

जागा वाटपाच्या बैठका सुरु असतानाच महाविकास आघाडीत खडाजंगी रंगलीय. तर उमेदवारी जाहीर करण्यावरून पवारांनी राऊतांना चांगलंच फटकारलंय. त्याला राऊतांनीही उत्तर दिलंय. मात्र महाविकास आघाडीत पवार आणि राऊत आमने-सामने का आलेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तर जागा वाटपाच्या बैठकांनी जोर धरलाय. त्यातच संजय राऊतांनी श्रीगोंद्याच्या जागेवर परस्पर साजन पाचपुतेंची उमेदवारी घोषित केल्याने शरद पवारांनी संजय राऊतांची कानउघडणी केलीय. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद उफाळून आलेत.

शरद पवारांनी राऊतांना खडेबोल सुनावल्यानंतर आता राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. स्थानिक इच्छूकांनी तयारीला लागावं यासाठी आम्ही संदेश दिला. मात्र राऊत एवढ्यावरच थांबले नाही तर आमची 288 जागांवर तयारी असल्याचं सांगत राऊतांनी पवारांना गर्भित इशारा दिलाय. श्रीगोंद्याच्या जागेवरून राऊत आणि पवारांमध्ये जुंपली असली तरी श्रीगोंद्यातील राजकीय स्थिती काय आहे पाहूयात.

मविआत उमेदवारीवरुन वादंग?

2014 मध्ये राष्ट्रवादीचे राहुल जगतापांचा पाचपुतेंवर 14 हजार मतांनी विजय

2014 मध्ये शिवसेनेच्या शशिकांत गाडेंना 22 हजार 54 मतं

2019 मध्ये भाजपच्या पाचपुतेंकडून राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलारांचा 4 हजार मतांनी पराभव

राऊतांकडून साजन पाचपुतेंना सिग्नल देण्यात आलाय. तर राहुल जगतापांनी पवारांची भेट घेत शक्तीप्रदर्शन केलंय. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद असलेल्या श्रीगोंद्यावरून महाविकास आघाडीत मीठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हा पेच कसा सोडवणार? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com