Bihar Fake Doctor: मुन्नाभाई डॉक्टरचा संतापजनक प्रताप! युट्युब व्हिडिओ पाहून केले ऑपरेशन; १५ वर्षीय मुलाने जीव गमावला

Fake Doctor Relies On YouTube Videos For Surgery: अजित कुमार पुरी असे या डॉक्टरचे नाव असून त्याने युट्यूबवर पाहून १५ वर्षीय मुलाची किडनी स्टोनवरील शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
Bihar Fake Doctor: मुन्नाभाई डॉक्टरचा संतापजनक प्रताप!  युट्युब व्हिडिओ पाहून केले ऑपरेशन; १५ वर्षीय मुलाने जीव गमावला
Fake Doctor Relies On YouTube Videos For Surgery:Saamtv
Published On

बिहार, ता. ९ सप्टेंबर

Bihar Bogas Doctor Case: कथित डॉक्टरने चक्क युट्यूबवर पाहून शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधून समोर आला आहे. या संतापजनक घटनेमध्ये १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे. अजित कुमार पुरी असे या डॉक्टरचे नाव असून त्याने युट्यूबवर पाहून १५ वर्षीय मुलाची किडनी स्टोनवरील शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

Bihar Fake Doctor: मुन्नाभाई डॉक्टरचा संतापजनक प्रताप!  युट्युब व्हिडिओ पाहून केले ऑपरेशन; १५ वर्षीय मुलाने जीव गमावला
Maharashtra Politics : 'माझ्या मुलगी अन् जावयाला नदीत फेकून द्या', धर्मरावबाबा आत्राम संतापले; काय आहे कारण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिहारमधील सारणमध्ये एका डॉक्टरने यूट्यूब पाहून ऑपरेशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑपरेशननंतर रुग्णाचा मृत्यू झाला. मोबाईलवर युट्युब पाहिल्यानंतर डॉक्टरने मुलावर शस्त्रक्रिया केली त्यामुळेच आपल्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा मधुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मबागी मार्केटमध्ये असलेल्या गणपती सेवा सदनमध्ये घडली.

सारण जिल्ह्यातील मधौरामधील गोलू साह उर्फ किशोरला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता. यानंतर त्याच्या आजोबाने नातवाला उपचारासाठी गणपती सेवा सदन रुग्णालयात दाखल केले. हा दवाखाना चालवणारे डॉक्टर अजित कुमार पुरी यांनी त्यांना न सांगता आणि परवानगी न घेता मुलावर शस्त्रक्रिया केली. ऑपरेशन दरम्यान मुलाची प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरांनी स्वतः रुग्णाला रुग्णवाहिकेत बसवून त्याच्या आजीसह पाटण्याच्या रुग्णालयात नेले. मात्र पाटण्याला जात असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मृतदेह टाकून डॉक्टर अजित फरार झाला.

Bihar Fake Doctor: मुन्नाभाई डॉक्टरचा संतापजनक प्रताप!  युट्युब व्हिडिओ पाहून केले ऑपरेशन; १५ वर्षीय मुलाने जीव गमावला
Pune Crime News : दारुड्या नवऱ्याचा पत्नीने काढला काटा, स्वयंपाक घरातील चाकू छातीत खुपसला

मृत्यूनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्लिनिकची तपासणी केली असून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. मयत किशोर गोलू हा त्याच्या आई-वडिलांचा मोठा मुलगा होता. किशोरच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांच्या जबाबावरून स्थानिक मधुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर आणि त्या क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत.

Bihar Fake Doctor: मुन्नाभाई डॉक्टरचा संतापजनक प्रताप!  युट्युब व्हिडिओ पाहून केले ऑपरेशन; १५ वर्षीय मुलाने जीव गमावला
Nigeria Accident: तेल टँकर- ट्रकची धडक अन् भीषण स्फोट, ४८ जण ठार; ५० गुरे जिवंत जळाली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com