Bihar Crime : मासे खाण्यासाठी घरी बोलावलं, जेवणातून विष दिलं; तरूणीने प्रियकराला संपवलं

Girlfriend Killed boyfriend from gaving poison : बिहारमध्ये एका तरूणीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रियकराला जेवणामध्ये विष देवून मारल्याचं समोर आलंय.
 तरूणीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना
Girlfriend Killed boyfriend Saam Tv
Published On

मुंबई : बिहारच्या गोपालगंजमधील एका तरूणीने प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आलीय. विशेष म्हणजे या तरूणीने प्रियकराला मासे खाण्यासाठी तिच्या घरी बोलावलं होतं. तिने त्याच्या जेवणात विष मिसळलं होतं. त्यामुळे मासे खाल्ल्यानंतर तरूणीची प्रकृती बिघडू लागली. त्यामुळे त्याला ताडतीने रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं होतं. त्याची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती, त्यामुळे त्याला गोरखपूर येथील मेडीकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं होतं.

ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंजारी परिसरात (girlfriend Killed boyfriend) घडली. पोलिसांनी माहिती मिळताच या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू केला. तरूणीने आपल्या प्रियकरालाच का संपवलं? हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. आपण या घटनेबाबत सविस्तर जाणून घेवू या.

नेमकं काय घडलं?

मृत तरूणाचं नाव तेजस्वी शर्मा आहे. तो नगर पोलीस स्टेशन हद्दीतील बंजारी वस्तीत राहत होता. त्याचं त्याच्याच परिसरातील एका तरूणीवर प्रेम होतं, अशी माहिती मिळतेय. तेजस्वी आधीच विवाहित असुन त्याला तीन मुलं देखील (Bihar Crime) आहेत, अशी माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे. तेजस्वी आणि त्याच्या प्रेयसीची ओळख कोर्टामध्ये झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. हळुहळु मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. परंतु पुन्हा अलीकडच्या काळात त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या.

 तरूणीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना
Dance Class Students Killing Case : १७ वर्षीय मुलाची डान्स क्लासमध्ये दहशत; धारदार शस्त्राने केली दोघांची हत्या, ९ जखमी

जेवणात विष मिसळलं

दरम्यान रविवारी रात्री या तरूणीने तेजस्वीला तिच्या घरी जेवणसाठी निमंत्रण दिलं होतं. त्याच्यासाठी मासे आणि भात बनवला होता. परंतु तिने बनवलेल्या माश्यांमध्ये विष (poison) मिसळलं होतं. प्रेयसीच्या घरी जेवण करताच तेजस्वीची प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर त्याने मित्राला फोन करून यासंदर्भात माहिती दिली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगाने (Crime News) फिरवली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं उपनिरीक्षक रुची कुमारी यांनी सांगितलं. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिलीय.

 तरूणीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना
Man kills daughter : पुन्हा सैराटचा थरार! आंतरजातीय प्रेमाला विरोध करत बापाने पोटच्या मुलीला संपवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com