Dance Class Students Killing Case : १७ वर्षीय मुलाची डान्स क्लासमध्ये दहशत; धारदार शस्त्राने केली दोघांची हत्या, ९ जखमी

Dance Class Students Killing case update : १७ वर्षीय मुलाने डान्स क्लासमध्ये दहशत केली आहे. या मुलाने धारदार शस्त्राने दोघांची हत्या केली. या घटनेत ९ जण जखमी झाले आहेत.
 Crime News
Crime NewsSaam tv
Published On

नवी दिल्ली : ब्रिटनमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलांचा डान्स सुरु असताना अचानक १७ वर्षीय मुलगा वर्गात शिरला. त्यानंतर या मुलाने दोन मुलांवर चाकू हल्ला केला. ब्रिटनच्या साऊथपोर्ट शहरातील हार्ट स्ट्रीट भागात ही घटना घडली आहे. या घटनेने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.

डान्स सुरु असताना अचानक वर्गात खळबळ उडाली. एकाने मुलांवर चाकू हल्ल्या केल्यानंतर इतर मुले जोरजोरात ओरडू लागले. २ तरुणांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुलाने त्यांच्यावरही हल्ला केला.

 Crime News
Pune Crime News : पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न; विश्रांतवाडी परिसरातील खळबळजनक घटना

अल्पवयीन मुलाने केलेल्या चाकू हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला. तर ९ मुले जखमी झाले आहेत. यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चाकूही जप्त केला आहे. या घटनेतील जखमींना चिल्ड्रन हॉस्पिटल, अॅन्ट्री विद्यापीठ हॉस्पिटल, साऊथपोर्ट आणि फॉर्मबी रुग्णालयात दाखल केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, १७ वर्षीय मुलगा अचानक डान्स क्लासमध्ये शिरला. या घटनेत २ तरुण जखमी झाले आहेत. या तरुणींनी मोठ्या प्रयत्नाने लहान मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तरुणाने हल्ला का केला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी दहशतवादविरोधी पोलीसही याचा तपास करत आहेत.

डान्स स्कूलचे मालक कॉलिन पॅरी यांनी पोलिसांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यातील जखमींमध्ये विद्यार्थिनी अधिक आहेत. या घटनेनंतर जवळील रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं आहे. आता या प्रकरणातील सर्व जखमी धोक्यातून बाहेर आहे.

 Crime News
Uran Crime News: यशश्रीच्या मारेकऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही शिक्षा देऊ; उरणकरांनी मोर्चा काढत केली मागणी

या घटनेनंतर ब्रिटनचे राजा प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी राणी कॅमिला यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. किंग चार्ल्स यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनलवरून घटनेविषयी दु:ख व्यक्त केलं. 'साऊथपोर्टमधील घटना दु:खद आहे. या घटनेमुळे माझ्या पत्नीलाही धक्का बसला आहे. ब्रिटनच्या राजा आणि राणींनी या मृतांच्या कुटुंबियाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहे. ब्रिटनेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी घटनेविषयी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच पोलिसांना घटनेविषयी आणि त्या मागील कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com