

अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मानलेल्या मामाने केलं भयंकर कृत्य
दातांच्या उपचारासाठी घेऊन जाताना कारमध्ये केला बलात्कार
पोलिसांनी आरोपीला अटक केली
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली. मानलेल्या मामानेच या मुलीसोबत हे भयंकर कृत् केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मामाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे अंबरनाथ हादरले आहे.
अंबरनाथ पश्चिमेला राहणारा हा नराधम पीडित मुलीच्या आईचा मानलेला भाऊ होता. त्यामुळं त्याचे पीडितेच्या घरी येणं जाणं होतं. पीडितेला मुंबईला दाताच्या उपचारांसाठी तो घेऊन जायचा. यावेळी त्याच्या कारमध्ये त्याने या मुलीवर बलात्कार केला. यानंतर एक दिवस पीडित मुलगी घरी एकटी असताना तिथेही त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरडा केल्यानं त्याला लोकांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.
याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून या नराधमाला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.
टिटवाला परिसरातील बल्याणी येथे काही दिवसांपूर्वी रोशन गोंधळी आणि कृष्णा यादव या दोघांना २ पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान टिटवाळा पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. अरमान शेख असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अरमान शेख याने पिस्तूल आणि काडतुसे आणून ती रोशन गोंधळी याच्याकडे दिली होती. या तिघांनी नेमका कोणता कट रचला होता, तसेच शस्त्रे आणि काडतुसांचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.