शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
Lender Tried To Crush FarmerSaam Tv

Akola Crime News: अकोल्यात सावकाराची दादागिरी; शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, धक्कादायक VIDEO व्हायरल

Lender Tried To Crush Farmer: अकोल्यामध्ये सावकाराने शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

अकोल्यामध्ये सावकाराला जमिनीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हे धक्कादायक कृत्य केलं आहे. ही घटना १७ मे रोजी घडली होती. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना अकोला तालुक्यातील मनब्दा गावातील असल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेमुळे अकोला (Akola Crime News) जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तेथे पोलीस यंत्रणेचा धाक उरला की नाही? हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा एक व्हिडिओ सध्या 'सोशल मीडिया'वर 'व्हायरल' होत आहे. हा सावकाराने तरूणाला केलेल्या मारहाणीचा (Lender Tried To Crush Farmer:) व्हिडिओ आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावातला हा व्हिडिओ आहे.

सावकाराला शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरून वाद आहे. हा वाद सध्या न्यायालयात आहे. परंतु शेळके यांनी दमदाटी करत शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला (Land Dispute) आहे.

शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
Akola Crime News: प्रेमात अडसर ठरत होती बायको; नवऱ्याने गाठला विकृतीचा कळस, मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत (Akola News) आहे. तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ल्या करण्यात आला आहे. यामध्ये महिला देखील हल्ल्याला विरोध करत असल्याचं दिसत आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये परस्पर तक्रारीवरून तसेच सावकारासह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
Akola Crime News : अकोल्यात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा; बहिणीनेच सख्या भावांची आणि भाच्यांची केली होती हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com